गंगाखेड येथे मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर धडकला दिंडी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 07:09 PM2018-08-08T19:09:57+5:302018-08-08T19:10:45+5:30

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवित अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Dindi Morcha on the Tahasil Office of gangakhed for Maratha Reservation | गंगाखेड येथे मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर धडकला दिंडी मोर्चा 

गंगाखेड येथे मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर धडकला दिंडी मोर्चा 

Next

गंगाखेड (परभणी ) : मराठा आरक्षणआंदोलनाला पाठिंबा दर्शवित अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने आज सकाळी १० वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार जिवराज डापकर यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.

अखिल भारतीय वारकरी मंडळात सहभागी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील वारकरी बांधवानी मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करत आज सकाळी दहा वाजता शहरातील जनाबाई मंदिरापासून टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी मोर्चा काढण्यात आला. या दिंडी मोर्चात वारकरी विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष भगवान महाराज सातपुते, भागवत बचाटे, बाळासाहेब भादुरे महाराज आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडी मोर्चाचे आगमन तहसिल कार्यालयासमोर झाल्यानंतर हभप श्रीकृष्णा महाराज अवलगावकर, गणेश महाराज कापसीकर आदींची भाषणे झाली. 

आंदोलकांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, मराठा आरक्षण आंदोलनात जीव दिलेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिवराज डापकर यांना दिले. 
 

Web Title: Dindi Morcha on the Tahasil Office of gangakhed for Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.