महिनाभरात शोधले कुष्ठरोगाचे ७२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:17+5:302020-12-30T04:22:17+5:30

कोरोनाच्या आपतकालीन परिस्थितीमुळे कुष्ठ व क्षय रुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण कमी झाले होते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या ...

Discovered 72 leprosy patients in a month | महिनाभरात शोधले कुष्ठरोगाचे ७२ रुग्ण

महिनाभरात शोधले कुष्ठरोगाचे ७२ रुग्ण

Next

कोरोनाच्या आपतकालीन परिस्थितीमुळे कुष्ठ व क्षय रुग्णांचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण कमी झाले होते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या रुग्णांचे लवकर निदान करण्यासाठी उपाययोजना सूचविल्या होत्या. दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन १ ते १६ डिसेंबर या काळात जिल्ह्यात कुष्ठरोग आणि क्षयरोग या दोन्ही आजारांच्या रुग्णांची शोध मोहीम राबविण्यात आली. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या दोन्ही रोगांचे लक्षणे सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण १३ लाख ८१ हजार १४१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात ४ हजार २६९ नागरिकांची संशयित म्हणून नोंद घेण्यात आली. त्यापैकी ४ हजार ५५७ संशयितांची नोंद घेण्यात आली आहे.

१६ डिसेंबरपासून प्रत्यक्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संशयित आढळलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्राप्त झालेल्या लक्षणानुसार हा रुग्ण कुष्ठरोगाचाच आहे का? त्याला किती वर्षांपासून हा आजार आहे आणि त्याच्यावर करावयाचे उपचार या संदर्भाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यात ७२ रुग्ण कुष्ठरोगाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे, आणखी दोन दिवस ही तपासणी केली जाणार असून, त्यात रुग्णांची संख्या वाढू शकते. मात्र या शोध अभियानात आतापर्यंत आरोग्य संस्थांकडे नोंद नसलेले आणि उपचारापासून दूर असलेले ७२ कुष्ठरोग रुग्ण शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे आता या रुग्णांवर वेळीच उपचार करुन त्यांना रोगापाूसन मुक्त करण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे.

१३ लाख नागरिकांची तपासणी

या अभियानांतर्गत आतापर्यंत १३ लाख ८१ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३८ हजार ४३६ कुटुंबियांची तपासणी करण्यात आली. त्यात ४ हजार ५५७ नागरिकांची नोंद घेण्यात आली असून, ४ हजार २५९ नागरिक संशयित म्हणून नोंद करण्यात आले आहेत.

नोंद झालेले सर्व रुग्ण प्राथमिक स्तरावरील

जिल्ह्यात आतापर्यंत ७२ कुष्ठरोग रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांचा आजार प्राथमिक स्वरुपाचा आहे. म्हणजेच तो असंसर्गिक स्वरुपाचा आहे. त्यामउळे काळजी करण्याचे कारण नाही. योग्य उपचार करुन या रुग्णांना कुष्ठरोगातून लवकरच बरे करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

Web Title: Discovered 72 leprosy patients in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.