पैशांची मागणी करत महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 06:41 PM2019-12-17T18:41:06+5:302019-12-17T18:42:51+5:30
महिला घरात एकटी असताना केला विनयभंग
गंगाखेड : 'तुझा नवरा कुठे गेला, माझे पैसे परत का देत नाही', असे म्हणत घरी एकटीच असलेल्या महिलेस गावातील एकाने मारहाण करत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी ( दि. १७ ) सकाळी ८ वाजता तालुक्यातील कासारवाडी येथे घडली. संभाजी अर्जुन कराड असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तालुक्यातील कासारवाडी येथे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक महिला घरात एकट्याच होत्या. यावेळी गावातीलच संभाजी अर्जुन कराड याने घरात घुसून महिलेच्या पतीने घेतलेल्या पैश्यांची मागणी केली. तसेच तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली व घराबाहेर ओढत आणले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार सुरेश पाटील हे करीत आहेत.