तंटामुक्ती अध्यक्षांना प्रशिक्षणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:58+5:302021-03-04T04:30:58+5:30
दिशादर्शक फलक रंगवले देवगांवफाटा: दिशादर्शक फलकाचा रंग निघुन गेल्याने वाहन चालकांची गैरसोय होत होती हि बाब ‘लोकमत’ ...
दिशादर्शक फलक रंगवले
देवगांवफाटा: दिशादर्शक फलकाचा रंग निघुन गेल्याने वाहन चालकांची गैरसोय होत होती हि बाब ‘लोकमत’ ने समोर आणली होती. याबाबत सा.बा.उपविभाग सेलू यांनी दखल घेत सेलू तालुक्यातील बहुतांश रस्त्यावरील दिशादर्शक फलकाला रंग देऊन त्यावर मार्ग,वळणरस्ता,आंतर याबाबीचे स्पष्ट लिखान केले आहे. त्यामुळे आत्ता वाहन चालकांची गैरसोय दुर झाली आहे.
अंगारकी चतुर्थीला कोरोनाचा फटका
देवगांवफाटा: मागील वर्षी कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविल्याने भावीकांना एक ही अंगारकी चतुर्थी साजरी करता आली नाही. मात्र यावर्षी ३ अंगारकी चतुर्थी असल्याने गणेश भक्तात उत्साह होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे पुन्हा बंद झाल्याने २ मार्च रोजीची पहिल्या अंगारकी चतुर्थीला फटका बसला आहे.तर यापुढे २७ जुलै व २३ नोव्हेंबर अशा दोन अंगारकी चतुर्थीकडे गणेश भक्तांचे लक्ष आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण द्यावे
देवगांवफाटा: उन्हाळ्यात शेतीमधील झाडे व झुडपावर मधमाशांचा वावर वााढत असुन या कालावधीत मध मोठ्या प्रमाणात तयार होत असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना मध संकलन करण्यासाठी मोठा वाव आहे. चांगल्या प्रकारचे मध संकलनासाठी युवकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.