धान्य वेळेत मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:22+5:302020-12-29T04:15:22+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारावा गंगाखेड - गंगाखेड तालुक्यातील धारासूर, महातपुरी, राणीसावरगाव, कोद्री, पिंपळदरी, मुळी या गावात असलेल्या प्राथमिक ...

Dissatisfaction among the beneficiaries for not getting the grain on time | धान्य वेळेत मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी

धान्य वेळेत मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी

googlenewsNext

प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारावा

गंगाखेड - गंगाखेड तालुक्यातील धारासूर, महातपुरी, राणीसावरगाव, कोद्री, पिंपळदरी, मुळी या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केद्रांचा वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. वैद्यकीय सेवांमध्ये सकारात्मक बदल करुन त्या अधिक दर्जेदार करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. तसेच ग्रामीण भागातील दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक रूग्ण गंगाखेड शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्ययावत उपकरणे, मुबलक औषधांचा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रीयीकृत बॅंकेत पगार करण्याची मागणी

गंगाखेड - लाॅकडाऊननंतर पैशांचा तुडवडा भासत असतानाच सर्वच शिक्षकांना पगाराची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतून वेळच्यावेळी मिळत नाही. अनुदानित निमशासकीय संस्थेच्या शाळेतील शिक्षकांनी पगार राष्ट्रीयीकृत बॅंकेतून करावा, अशी मागणी केली होती. या मागणीकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष झाले आहे. शिक्षकांचा पगार राष्ट्रीयीकृत बॅंकेत त्यांच्या खात्यावर जमा करावा, ही मागणी प्रलंबित आहे. या मागणीकडे प्रशासनाने, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी

गंगाखेड - गंगाखेड तालुक्यात गत आठवड्यापासून कडाक्याची थंडी पडत आहे. या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी उबदार कपडे खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. स्वेटर, कानटोप्या, कानपट्टी यांची खरेदी ग्राहकांकडून केली जात आहे. घराबाहेर पडताना नागरिक थंडी वाजू नये म्हणून उबदार कपडे घालूनच बाहेर पडत आहेत. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी शेती सिंचन करताना शेतकरी घोंगडीचा वापर करत आहेत. शहरातील रस्त्यावर परराज्यातून आलेल्या विक्रेत्यांनी स्वेटर विक्रीची दुकाने थाटली आहेत.

ॲड. सद्दाम खान हबीब खान यांची निवड

गंगाखेड - शहरातील ॲड. सद्दाम खान हबीब खान याची टीपू सुलतान ब्रिगेड या संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड टीपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख सुभान अली यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हिरूद्दीन पठाण यांनी केली आहे. यावेळी सय्यद अयाज, तरबेज अहेमद, मुजाहेद शेख, आवेस सौदागर, मुजीब सौदागर, अरबाज खान, सादेक सौदागर उपस्थित होते.

Web Title: Dissatisfaction among the beneficiaries for not getting the grain on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.