३३८ दिव्यांगांना धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:26 AM2020-12-05T04:26:57+5:302020-12-05T04:26:57+5:30

सेलू : नगरपालिकेच्या महसूल अर्थसंकल्पात शहरातील दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्यासाठी तरतूद करून ३३८ दिव्यांगांना २ डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक परिसरात ...

Distribution of checks to 338 persons with disabilities | ३३८ दिव्यांगांना धनादेशाचे वाटप

३३८ दिव्यांगांना धनादेशाचे वाटप

Next

सेलू : नगरपालिकेच्या महसूल अर्थसंकल्पात शहरातील दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्यासाठी तरतूद करून ३३८ दिव्यांगांना २ डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक परिसरात दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष विनोद बाेराडे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले .

नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात महसूलच्या ५ टक्के निधी दिव्यांगांना राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार शहरातील ३३८ दिव्यांगांना सहाय्य करण्यासाठी ९ लाख २० हजारांची तरतूद केलेली आहे. प्रमाणपत्रातील टक्केवारीनुसार अर्थसहाय्य करण्यात आले. शहरात ८० टक्के दिव्यांग असलेले ८० लाभार्थी असून, दरवर्षी ४ हजार रुपये, ६० टक्के दिव्यांग असलेल्या ६६ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये तर ४० टक्के दिव्यांग असलेल्या १८३ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, प्रा. डॉ. राजाराम झोडगे, नगरसेवक विठ्ठल काळबांडे, नागेश पैठणकर, धनंजय बायस आदींची उपस्थिती होती.

Web Title: Distribution of checks to 338 persons with disabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.