पावणेपाच लाख बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:30 AM2021-03-04T04:30:21+5:302021-03-04T04:30:21+5:30
५ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये ३० टक्के ...
५ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये ३० टक्के रक्तक्षय आढळतो. वैयक्तिक व परिसरातील स्वच्छतेच्या अभावामुळे लहान मुलांच्या पोटात कृमी होतात. आतड्यांमध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका असतो. त्यामुळे बालकांत कमजोरी येते. रक्तक्षय, कुपोषित बालकांची बौद्धिक, शारीरिक वाढ खुंटते. जंतांमुळे बालकांना त्रास होऊ नये, यासाठी जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम जिल्ह्यात १ मार्चपासून राबविण्यात येत आहे.
घरोघरी जाणार, पण कसे?
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन बालकांना या गोळ्यांचे वाटप कसे करावे, असा प्रश्न या मोहिमेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पडला आहे. यावरून काही कर्मचारी संभ्रमात आहेत.
कर्मचाऱ्यांची फौज
जंतनाशक गोळ्या वाटप करण्यासाठी जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शिक्षक आदी कर्मचाऱ्यांची फोैज तैनात करण्यात आली आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये बालकांना बोलावून गोळ्या वाटप करण्यात आल्या. याची आकडेवारी मात्र आरोग्य विभागाकडे नाही.
जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ४ लाख ८५ हजार बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक आदींचे सहकार्य लाभत आहे. या मोहिमेसंदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हास्तरावर १३ मार्च रोजी प्रप्त होणार आहे.
- डॉ. शंकर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.