परभणी येथे जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरण:समृद्ध मराठवाड्यासाठी चिंतन करण्याची गरज- मालकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:12 PM2018-10-10T23:12:58+5:302018-10-10T23:14:00+5:30
पूर्वी मराठवाडा प्रदेश हा जगाशी व्यवहार करणारा प्रदेश होता. त्यामुळे या प्रदेशाला समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जात होते. मात्र हीच समृद्धी आज लोप पावली असून मराठवाड्याला पुन्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: पूर्वी मराठवाडा प्रदेश हा जगाशी व्यवहार करणारा प्रदेश होता. त्यामुळे या प्रदेशाला समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जात होते. मात्र हीच समृद्धी आज लोप पावली असून मराठवाड्याला पुन्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.
येथील हेमराज जैन प्रतिष्ठानच्या वतीने ९ आॅक्टोबर रोजी जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पत्रकार यमाजी मालकर यांना यावर्षीचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरल शुगर लि.चे संस्थापक बी.बी. ठोंबरे उपस्थित होते. व्यासपीठावर आ.डॉ.राहुल पाटील, प्राचार्य डॉ.वामनराव जाधव, कवि प्रा.इंद्रजीत भालेराव, अॅड. अशोक सोनी, अनिल जैन, विमल जैन, अंजली मालकर, सुनील जैन, निखील जैन यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.गोपाळराव पाटील यांनी हेमराज जैन यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करुन बेरोजगार व शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडविता येतील, असेही ठोंबरे म्हणाले. प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी हेमराज जैन प्रतिष्ठानची भूमिका विषद केली. अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.प्रशांत मेने यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. अजीत मातेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सचिन खडके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.एस. डोळे, मुख्याध्यापिका कंधारकर, प्राचार्य संजय जोशी, उपप्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे, डॉ.एन.व्ही.सिंगापूरे आदींनी प्रयत्न केले.