४२८ फेरीवाल्यांना कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:08 AM2021-01-24T04:08:25+5:302021-01-24T04:08:25+5:30
परभणी मनपा राज्यात प्रथम पीएम स्वनिधी अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या कामात परभणी मनपाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दिलेल्या ...
परभणी मनपा राज्यात प्रथम
पीएम स्वनिधी अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या कामात परभणी मनपाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या दुप्पट फेरीवाल्याची नोंदणी परभणी महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे हे फेरीवाले आता शासनाच्या योजनेसाठी पात्र झाले असून, त्यांना अनुदान देण्याची जबाबदारी त्या त्या बँकांकडे देण्यात आली आहे.
बँकांची उदासिनता कायम
शहरातील विविध बँकांकडे फेरीवाल्यांची नोंदणी झाली असली तरी काही मोजक्याच बँकांनी अनुदान वितरित केले आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेने ६,स्टेडियम शाखेने ६, वसमत रोड शाखेने ५, जिंतूर रोड शाखेले ३७ तर सर्वाधिक बँक ऑफ बडोदा मुख्य शाखेने ११३ जणांना कर्ज वाटप केले आहे. मात्र युको बँक, अलहाबाद बँक, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक या बँकांनी शासनाच्या योजनेनुसार कर्ज वाटप करण्यास आखडता हात घेतला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही बँकांकडून कर्ज वाटप होत नसल्याने उद्दिष्टपूर्तीला अडथळे निर्माण झाले आहेत.