शालेय पोषण आहाराचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:44+5:302020-12-27T04:12:44+5:30

घंटागाड्या उशिरा सोडण्याची मागणी गंगाखेड : कडाक्याची थंडी पडत असल्याने शहरात कचरा जमा करणा-या घंटागाड्या सकाळी ९ वाजता सोडण्यात ...

Distribution of school nutrition food | शालेय पोषण आहाराचे वाटप

शालेय पोषण आहाराचे वाटप

Next

घंटागाड्या उशिरा सोडण्याची मागणी

गंगाखेड : कडाक्याची थंडी पडत असल्याने शहरात कचरा जमा करणा-या घंटागाड्या सकाळी ९ वाजता सोडण्यात याव्यात.तसेचे रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे.शहरातील सर्वच काॅलन्यात, गल्ली रस्त्यावर कचरा कुंडी नसल्याने कचरा घंटा गाड्यात टाकावा लागतो.दिवसभरातील घरातला कचरा घंटा गाडीचा आवाज येताच कचरा टाकण्यासाठी गृहिनी,नागरीकाना बाहेर मुख्य रस्त्यावर यावे लागते.थंडी आणि संचारबंदी लक्षात कचरा घेण्यासाठी येणा-या घंटा गाड्या उशिराने सोडण्यात याव्यात अशी मागणी गृहीनी,नागरीकातुन होत आहे.

खड्डे दुरुस्त करण्याची मागणी

गंगाखेड : गंगाखेड- राणीसावरगाव रस्त्यावर खड्डे पडले असुन या खड्डयाचा त्रास वाहन धारकाना होत आहे.गंगाखेड सुप्पा मार्ग पिपळदरी मार्गावर खड्डे पडले आहेत.परतीच्या पावसाने झालेली अतिवृष्टीमुळे रस्ते खराब झाले.जागोजागी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्डा चुकवण्यासाठी ऑटो चालक ,दुचाकीस्वार अचानक वाहन वळवत आहेत.समोरून व पाठीमागुन वेगाने येणा-या चारचाकी वाहनाच्या चालकाना वळवलेले वाहन लक्षात येत नाही.यातून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर असलेले खड्डे त्वरीत दुरूस्ती करावे अशी मागणी केली जात आहे.

गाव पुढारी सक्रीय

गंगाखेड : कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन दरम्यान नागरीकांच्या अडचणीच्या वेळी गाव पुढारी,राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, लोक प्रतिनिधी जनतेसमोर फिरकले नसल्याची सल ग्रामस्थात, मतदारात आहे.लाॅकडाऊन काळात नागरिकाच्या व्यथा जाणुन घेण्यास कोणी पुढे आले नाही.ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामस्थात सलगी निर्माण करण्यासाठी गाव पुढारी जवळीक निर्माण करत आहेत.गाव पुढा-याच्या वागण्याने नागरिक विस्मयचिकीत होऊन त्याना लाॅकडाऊन काळात कुठे होतात.असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.या प्रश्नाने गाव पुढा-याची गोची उडत असुन पंचाईत पडत असल्याचे दिसुन येते.

स्वच्छतागृहाभावी महिलांची कुचंबना

गंगाखेड : नेहरू चौक, शिवाजी चौक, सराफा बाजार या भागात महिलासाठी स्वच्छतागृह नसल्याने महिलाची कुचंबणा होते. सराफा बाजारात मनीमंगळ सुत्र, पोत,माळ, विणण्यासाठी या बाजारात येतात.तसेच सोन्याचे,चादीचे दागीने खरेदी व मोडीसाठी महिला येतात.सराफा बाजारात महिलाची येण्याची संख्या अधिक आहे.नगरपालिकेच्या वतीने या भागात एकही महिलासाठीचे स्वच्छतागृह बांधलेले नाही.सराफा बाजारात महिलासाठी स्वच्छतागृह बाधण्याची मागणी होत आहे.नगरपालीकेच्या प्रशासनाला याची माहिती आहे.या बाजारपेठेत नगरपालिका अस्तित्वात आल्यापासुन या बाजार पेठेत महिलासाठी स्वच्छतागृह बांधले नाही.नगरपालीकेच्या या दुर्लक्षित धोरणाचा महिला वर्गात संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Distribution of school nutrition food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.