शेतकऱ्यांना तुषार संचाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:48+5:302021-03-22T04:15:48+5:30

विद्यापीठातील अ. भा. समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने १९ मार्च रोजी हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ...

Distribution of sprinkler sets to farmers | शेतकऱ्यांना तुषार संचाचे वाटप

शेतकऱ्यांना तुषार संचाचे वाटप

Next

विद्यापीठातील अ. भा. समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने १९ मार्च रोजी हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, पं. स. सदस्य दत्तराव जाधव, सरपंच सुभाषराव जाधव, उपसरपंच महादेव जाधव, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे, कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, आदींची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, अनेक गावात पाण्याची मुबलकता असते. या पाण्याचा काटेकोर वापर होणे गरजेचे आहे. आधुनिक सिंचन पद्धतीत तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते. विद्यापीठाने विविध माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. अशोक कडाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहा शेतकऱ्यांना डॉ. ढवण यांच्या हस्ते तुषार संच वाटप करण्यात आले. डॉ. गजानन गडदे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तराव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार गिराम, विलास जाधव, रत्नाकर पाटील, देवेंद्र कुऱ्हा, बालू रन्हेर, आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Distribution of sprinkler sets to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.