४९८ अहवालांची जिल्ह्याला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:22 AM2020-12-30T04:22:28+5:302020-12-30T04:22:28+5:30

परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत ८१ हजार ९४६ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ७३ हजार ९७१ नागरिकांचे अहवाल ...

District awaits 498 reports | ४९८ अहवालांची जिल्ह्याला प्रतीक्षा

४९८ अहवालांची जिल्ह्याला प्रतीक्षा

Next

परभणी : जिल्ह्यात आतापर्यंत ८१ हजार ९४६ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ७३ हजार ९७१ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, याच तपासण्यांमधील ४९८ स्वॅब नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे आरटीपीसीआरच्या सहाय्याने घेतलेले हे नमुने पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह, याचा उलगडा झाला नसल्याने या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यावेळी घेतलेल्या एकूण स्वॅब नमुन्यांमधील ९९ नमुने प्रयोगशाळेने परत केले आहेत.

कोरोनाने परजिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू

परभणी : सोमवारी कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील एका रुग्णाचा परजिल्ह्यात मृत्यू झाला आहे. ‘आयसीएमआर’च्या निर्देशानुसार या मृत्यूची नोंद परभणी जिल्ह्याच्या यादीत घेण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३०३ झाली आहे.

५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

परभणी : जिल्ह्यात सध्या ११० रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. त्यापैकी ५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. रविवारपर्यंत ६२ रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जात होते. त्यापैकी ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे.

Web Title: District awaits 498 reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.