शुक्रवारपासून जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:04+5:302021-03-19T04:17:04+5:30
परभणी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून १९ मार्चपासून जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ६ ...
परभणी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून १९ मार्चपासून जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाय करीत असून, हा संसर्ग कमी होत नसल्याने आता खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतला आहे. १९ मार्चपासून ते २५ मार्चपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. संचारबंदी काळात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व खासगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, आपत्कालीन व त्या संबधी सेवा, प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक, पत्रकार, वार्ताहर, वितरक, पेट्रोल पंप व गॅस वितरक कर्मचारी आणि त्यांची वाहने, त्याचप्रमाणे रात्री रेल्वे व बसमधून उतरणाऱ्या नागरिकांसाठी सूट राहणार आहे. या व्यतिरिक्त कोणीही संचारबंदी काळात रस्त्याने, बाजारामध्ये फिरताना आढळून आल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिला आहे.