जिल्ह्याचा माॅर्टेलिटी रेट मराठवाड्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:37+5:302021-01-13T04:41:37+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटलेला असला तरी जिल्ह्याचा माॅर्टेलिटी रेट ३.९८ एवढा असून, तो मराठवाड्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे ...
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटलेला असला तरी जिल्ह्याचा माॅर्टेलिटी रेट ३.९८ एवढा असून, तो मराठवाड्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या घटल्यानंतरही जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने कमी झाले आहेत. जिल्ह्यात सध्या केवळ ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मॉर्टेलिटी रेट अधिक आहे. जिल्ह्यात केवळ ७३ रुग्ण असून त्यांचा माॅर्टेलिटी रेट ३.९८ एवढा आहे. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात केवळ ६१ सक्रिय रुग्ण असून, या रुग्णांचा मॉर्टेलिटी रेट १.५१ एवढा आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात ४१४ सक्रिय रुग्ण असून, या रुग्णांचा मॉर्टेलिटी रेट केवळ २.६३ एवढाच आहे. जालना जिल्ह्यातही १८७ सक्रिय रुग्ण असून, या जिल्ह्याचा मॉर्टेलिटी रेट २.६४ आहे. नांदेड जिल्ह्यात ३१३ सक्रिय रुग्ण असून, या रुग्णांचा माॅर्टेिलटी रेट ३.१६, बीड जिल्ह्याचा मॉर्टेलिटी रेट ३.२७, लातूर जिल्ह्याचा २.०२ आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा मॉर्टेलिटी रेट ३.४३ एवढा आहे. एकूण मराठवाडा विभागाचा विचार करता मराठवाड्यात १ हजार ९३५ सक्रिय रुग्ण असून, या रुग्णांचा माॅर्टेलिटी रेट २.९६ एवढा आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
जिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. हिंगोली जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक ९६.७८ टक्के आहे. परभणी जिल्ह्यात ९५.०७ टक्के आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात ९६.४७ टक्के, जालना ९५.९६, नांदेड ९५.२१, बीड ९४.९०, लातूर ९५.५८ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४० टक्के एवढे आहे.