मुंबईतील डॉक्टर महिलेला ८ लाखांना फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:12 AM2020-12-27T04:12:38+5:302020-12-27T04:12:38+5:30

सेलू :- कमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील एका डाॅक्टर महिलेला सेलू येथे बोलावून मारहाण ...

A doctor in Mumbai cheated a woman for Rs 8 lakh | मुंबईतील डॉक्टर महिलेला ८ लाखांना फसविले

मुंबईतील डॉक्टर महिलेला ८ लाखांना फसविले

Next

सेलू :- कमी भावात सोने देतो म्हणून मुंबई येथील एका डाॅक्टर महिलेला सेलू येथे बोलावून मारहाण करीत ८ लाख रुपयांना लुटल्याची घटना सेलूजवळील डिग्रस बरसाले शिवारातील शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

डाॅ. उज्ज्वला संदीप बोराडे यांचा मालाड येथे दवाखाना आहे. सुनीता (पूर्ण नाव माहीत नाही) ही महिला पेशंट म्हणून अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे येत होती. एक वर्षानंतर डाॅ. उज्ज्वला यांना सुनीता यांनी १ महिन्यापूर्वी फोन करून आम्हाला गावाकडील शेतात १ किलो सोने सापडले आहे. तुम्हाला ३० हजार रुपये तोळाप्रमाणे देते, असे सांगितले. त्यानंतर डाॅ. उज्ज्वला या शुक्रवारी पती, काका यांना घेऊन वाहनाने सोने खरेदी करण्यासाठी सेलू येथे आल्या. त्यांना सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावरील एका शेतात सोन्याचा व्यवहार करण्यासाठी नेले. डाॅ.उज्ज्वला यांच्याकडे रक्कम असल्याची खात्री होताच सुनीता आणि त्यांच्या सात साथीदारांनी उज्ज्वला तसेच सोबत असलेले पती आणि काका यांंना काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील ८ लाख रुपये रोख आणि मोबाइल फोन असे ८ लाख २१ हजार रुपये लुटून आरोपी फरार झाले. याप्रकरणी डाॅ.उज्ज्वला संदीप बोराडे यांच्या फिर्यादीवरून सुनीतासह इतर ८ आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर तपास करीत आहेत.

यापूर्वी झाला होता सोन्याचा व्यवहार

सुनीता हिने यापूर्वी डाॅ. उज्ज्वला बोराडे यांना सेलू येथे बोलावून ३० हजार रुपयांत दोन सोन्याच्या गिण्णी व अंगठी दिली होती. त्यांनी मुंबईत सोने खरे आहे की खोटे याची पडताळणी केली असता दिलेले सोने खरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डाॅ. उज्ज्वला यांना खात्री झाल्याने त्यांनी सोने नेण्यासाठी ८ लाख रुपये सोबत आणले होते. मात्र, आरोपींनी दुसऱ्यावेळी शेतात नेऊन त्यांना मारहाण करत रक्कम लुटली. दरम्यान, कमी भावात सोने घेण्याचा हव्यास त्यांना महागात पडला.

Web Title: A doctor in Mumbai cheated a woman for Rs 8 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.