लग्नात डॉल्बी; हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2015 12:38 AM2015-04-29T00:38:24+5:302015-04-29T15:48:49+5:30

लातूर : लग्नात परवानगीपेक्षा अधिक वेळ डॉल्बी वाजवून दारूगोळ्याची आतषबाजी केल्यामुळे लग्न सोहळ्याच्या संयोजकासह मंगल कार्यालयाच्या मालकावर

Dolby at the wedding; Thousand penalties | लग्नात डॉल्बी; हजाराचा दंड

लग्नात डॉल्बी; हजाराचा दंड

Next


लातूर : लग्नात परवानगीपेक्षा अधिक वेळ डॉल्बी वाजवून दारूगोळ्याची आतषबाजी केल्यामुळे लग्न सोहळ्याच्या संयोजकासह मंगल कार्यालयाच्या मालकावर एमआयडीसी पोलिसांच्या तक्रारीनुसार शनिवारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता़ लातूर शहरातील बड्या हस्तींवर हा खटला दाखल झाल्याने खळबळ उडाली होती़ या खटल्यात जागामालक व लग्नसंयोजकांनी गुन्हा मान्य केल्यानंतर मंगळवारी लातूरच्या न्यायालयाने दोघांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़
लातूरच्या बार्शी रोडवरील शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर शेखर लक्ष्मीकांत ताथोडे यांच्या मालकीच्या खुल्या जागेतील लॉनवर २१ व २२ एप्रिल रोजी लग्न सोहळ्याचे संयोजक राजकुमार अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी विवाह सोहळा आयोजित केला होता. दरम्यान २२ एप्रिलच्या रात्री १२.३० वाजेपर्यंत वरातीच्या नावाखाली डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज तसेच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एमआयडीसी पोलिसांना आदेश दिल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षक उमाप यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार लग्न सोहळ्याचे संयोजक राजकुमार इंद्राज अग्रवाल (रा. कातपूर रोड, लातूर) आणि विवाह सोहळा जेथे होता तेथील जागा मालक शेखर लक्ष्मीकांत ताथोडे (रा. सावेवाडी, लातूर) या दोघांविरुद्ध भादंवि कलम ३६ (ड)/ १३४ मुंबई पोलिस कायद्यानुसार लातूरच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला़ दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी प्रमीला सगर यांनी मंगळवारी या दोघांना लातूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट सातवे न्या़ के़एम़पत्रे यांनी दोघांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे़ (प्रतिनिधी)
लातुरात पहिल्यांदाच अशा खटल्यातून शिक्षा...
४लातूरच्या दोन बड्या हस्तींवर अशा पद्धतीची कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली होती़ लग्नात उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी, मोठा आवाज, वरातीच्या नावाखाली रस्ता अडथळा झाल्याप्रकरणी लातुरात हा पहिल्यांदाच खटला दाखल झाला होता़डॉल्बी वाजविणे व फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी संबंधित लग्न सोहळा संयोजकांनी परवानगी घेतली होती. मात्र वेळेचे उल्लंघन संयोजकांकडून झाले. त्यामुळे हा खटला दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Dolby at the wedding; Thousand penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.