भिक नको, घेऊ घामाचे दाम; पिकविमा, एफआरपीसाठी स्वाभिमानीचे उपोषण
By मारोती जुंबडे | Published: April 10, 2023 05:35 PM2023-04-10T17:35:50+5:302023-04-10T17:36:02+5:30
शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
परभणी: जिल्हा व परिसरातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला. मात्र या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम कारखाना बंद झाल्यानंतर १४ दिवसात देणे बंधनकारक आहे, असे असतानाही बहुतांश कारखान्यांनी ही पूर्ण रक्कम दिलेली नाही. यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १० एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी देण्यात आलेल्या भिक नको,घेऊ घामाचे दाम, शेतकरी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
जिल्हा व परिसरातील साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेलेला आहे. या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम कारखाना बंद झाल्यावर १४ दिवसात देणे असा कायदा आहे. मात्र बऱ्याच कारखान्यांनी ही पूर्ण रक्कम देलेली नाही, २०२१ व २०२२ चा पिक विमा रक्कम देण्यास विमा कंपन्या चालढकल करीत आहेत, ती रक्कम देण्यात यावी, पावसाळ्यात ज्यावेळी अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतीपिकांना अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र आजही निकषापेक्षा तीनपट रक्कमेपासून वंचित आहेत. ती रक्कम तत्काळ देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १० एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात किशोर ढगे, भास्कर खटिंग, मुंजाभाऊ लोडे, पंडित भोसले, पी. टी. निर्वळ, मुनीर पटेल, बालकिशन चव्हाण, रामेश्वर अवरगंड, प्रसाद गरुड, बाळासाहेब घाटोळ, उध्दव जंवजाळ, माऊली शिंदे, शेख सलीम, काशिनाथ शिंदे, निवत्ती गरुड, विकास भोपळे, शेख चाँद, हनुमान आमले, गोविंद आमले, राजपाल देशमुख, राम चोकट, चंद्रकांत लोखंडे, माऊली लोडे, मोकिंद वावरे, अंकुश शिंदे, अंगद गरुड यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.