शहरातील अरुंद रस्त्यांवर दुहेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:40+5:302021-03-19T04:16:40+5:30
भाजीपाल्याचे भाव गडगडले परभणी : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून आठवडी बाजार बंद असल्याने भाजी उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे. ...
भाजीपाल्याचे भाव गडगडले
परभणी : जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून आठवडी बाजार बंद असल्याने भाजी उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे. भाज्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने अनेकांच्या भाज्यांची नासाडी होत असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आठवडी बाजार बंद असल्याने भाज्यांचे भाव गडगडले असून, मागील महिन्यात ५० रुपये किलो दराने विक्री केले जाणारे कांदे आता ५० रुपयांना तीन किलो, बटाटे १० रुपये किलो, टोमॅटो १० रुपयाला दीड किलो या दराने विक्री केले जात आहेत.
स्कूल व्हॅनचालक आर्थिक संकटात
परभणी : तब्बल एक वर्षापासून शाळा प्राथमिक शाळा बंद असून, स्कूल व्हॅनचालकांचा व्यवसाय ठप्प आहे. कर्ज घेऊन खरेदी केलेल्या वाहनाचे बँकांचे हप्ते थकले आहेत. तसेच कुटुंबियांचा उदरनिर्वाह करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शाळेशी जोडलेल्या या वाहनचालकांना आता पर्यायी व्यवसाय शोधावा लागत आहे. तेव्हा या व्हॅनचालकांना शासनाने मदत करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
कार्यालयांतील
सॅनिटायझर मशीन बंद
परभणी : मागीलवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात सॅनिटायझर मशीन बसविण्यात आली होती. मात्र हा संसर्ग कमी झाल्यानंतर ही मशीन बंद पडली. आता पुन्हा रुग्णांची संख्या वाढली आहे; मात्र तरीही शासकीय कार्यालयांतील सॅनिटायझर मशीन बंदच आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.