डॉ.आंबेडकर यांची जन्मभूमी भारतीयांचे प्रेरणास्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:27+5:302021-01-20T04:18:27+5:30
परभणी : बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी हे संबंध भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. तेथील विकास करणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
परभणी : बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी हे संबंध भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. तेथील विकास करणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिशनसाठी काम करणे हे ध्येय आहे, असे प्रतिपादन भदंत प्रा.सुमेधबोधी महाथेरो यांनी केले.
मध्य प्रदेशातील भीमजन्मभूमी महू येथील बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या अध्यक्षपदी भदंत प्रा.सुमेधबोधी महाथोरे यांची निवड झाली आहे. याबद्दल १७ जानेवारी रोजी जुना पेडगावरोड भागातील विवेकानंदनगर येथील चक्रवर्ती राजा सम्राट अशोक बुद्धविहारात महाबोधी परिवाराच्या वतीने भदंत प्रा.सुमेध बोधी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
कार्यक्रमास भदंत धम्मदीप थेरो, भदंत कमलशील, भदंत पूर्णबोधी आदी भिक्खूंची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य महासचिव प्रा.बी.आर. बनसोडे, जिल्हाध्यक्ष सायस मोडक, प्रा.कुऱ्हाडे, ॲड. सुनील सौंदरमल, पीआरपीचे राज्य सचिव गौतम मुंडे, अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, हनुमंत गादेवार, नरेश मुळे, बी. एन. इंगोले, कोंडिबा कांबळे आदींची उपस्थिती होती. इंजिनिअर अरविंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. भानुदास साबळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.