डॉ. आंबेडकर यांची जन्मभूमी भारतीयांचे प्रेरणास्थान - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:32+5:302021-01-22T04:16:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. तेथील विकास करणे ...

Dr. Ambedkar's birthplace is the inspiration of Indians - A - A | डॉ. आंबेडकर यांची जन्मभूमी भारतीयांचे प्रेरणास्थान - A - A

डॉ. आंबेडकर यांची जन्मभूमी भारतीयांचे प्रेरणास्थान - A - A

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. तेथील विकास करणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिशनसाठी काम करणे हे ध्येय आहे, असे प्रतिपादन भदंत प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी केले.

मध्य प्रदेशातील भीम जन्मभूमी महू येथील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या अध्यक्षपदी भदंत प्रा. सुमेधबोधी महाथोरे यांची निवड झाली आहे. याबद्दल १७ जानेवारी रोजी जुना पेडगाव रोड भागातील विवेकानंद नगर येथील चक्रवर्ती राजा सम्राट अशोक बुद्धविहारात महाबोधी परिवाराच्यावतीने भदंत प्रा. सुमेध बोधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भदंत धम्मदीप थेरो, भदंत कमलशील, भदंत पूर्णबोधी आदी भिक्खूंची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य महासचिव प्रा. बी. आर. बनसोडे, जिल्हाध्यक्ष सायस मोडक, प्रा. कुऱ्हाडे, ॲड. सुनील सौंदरमल, पीआरपीचे राज्य सचिव गौतम मुंडे, अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, हनुमंत गादेवार, नरेश मुळे, बी. एन. इंगोले, कोंडिबा कांबळे आदी उपस्थित होते. अभियंता अरविंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर भानुदास साबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Dr. Ambedkar's birthplace is the inspiration of Indians - A - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.