मद्यधुंद चालकामुळे दोघांचे प्राण गेले; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

By ज्ञानेश्वर भाले | Published: October 20, 2022 06:06 PM2022-10-20T18:06:11+5:302022-10-20T18:06:25+5:30

न्यायालयीन काम आटोपून दुचाकीवरून परताना टेम्पोने उडवले; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

Drunk driver kills two; Two men on a two-wheeler died on the spot in a collision with a speeding tempo in Parabhani | मद्यधुंद चालकामुळे दोघांचे प्राण गेले; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

मद्यधुंद चालकामुळे दोघांचे प्राण गेले; भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

ताडबोरगाव (जि. परभणी) : आयशर टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पाथरी-परभणी महामार्गावरील किन्होळा पाटीनजीक घडली.

सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथील रहिवासी असलेले बालाजी भारत गायकवाड (२५) व भाऊसाहेब महादेव सागडे (२३) हे परभणी येथील न्यायालयीन काम आटोपून दुचाकी क्र. (एमएच २२ एजे ११६७) वरून सेलूकडे परतत होते. महामार्गावरील किन्होळा पाटीनजीक समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोसोबत ( क्र. एमएच ४२ बीएफ ५४१०) त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील महादेव सागडे व बालाजी गायकवाड हे दोघे जागीच ठार झाले. 

अपघातानंतर सदरील टेम्पो शेजारील शेतात शंभर फूट आतमध्ये गेला होता. दरम्यान, घटनेची माहिती कळताच परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक भीमराव कदम, स्वाती कावळे, पोलीस कर्मचारी सूर्यकांत फड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन टेम्पोच्या मद्यधुंद चालकास ताब्यात घेतले.

जमावाकडून टेम्पो पेटवून देण्याचा प्रयत्न 
घटनास्थळी मृतांच्या नातेवाइकांनी आयशर टेम्पो पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी जमावाला शांत करून आयशर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केला. तर मृतांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत परभणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Drunk driver kills two; Two men on a two-wheeler died on the spot in a collision with a speeding tempo in Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.