इंटरनेट सेवा खंडित झाल्याने पाथरीच्या निबंधक कार्यालयातील व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:10 PM2018-04-11T17:10:49+5:302018-04-11T17:12:21+5:30

दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा नसल्याने खरेदी-विक्री आणि गहन खताचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

Due to the discontinuation of internet service, the Pathari registrar offices work stopped | इंटरनेट सेवा खंडित झाल्याने पाथरीच्या निबंधक कार्यालयातील व्यवहार ठप्प 

इंटरनेट सेवा खंडित झाल्याने पाथरीच्या निबंधक कार्यालयातील व्यवहार ठप्प 

Next
ठळक मुद्दे तीन दिवसांमध्ये जवळपास ३५ व्यवहार पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे या व्यवहारासाठी आलेल्या पक्षकार, साक्षीदार यांनाही नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. 

पाथरी  (परभणी ) : दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा नसल्याने खरेदी-विक्री आणि गहन खताचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तीन दिवसांत किमान 35 दस्तावेजाचे काम प्रलंबित आहे. 

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री, गहन खत, भाडेपत्र आणि इतर काही व्यवहार केले जातात.सर्व शासकीय कार्यालय प्रमाणे येथील व्यवहार ही ऑनलाइन आहे. ऑनलाइन व्यवहारामुळे दस्तऐवजात होणाऱ्या गैर व्यवहाराला आळा बसला. मात्र आता ही  ऑनलाइन सेवा काहीसी अडचणींची ठरत आहेत. मागील तीन दिवसांपासून कार्यालयात इंटरनेटची सेवा बंद आहे. यामुळे दस्तऐवजीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तीन दिवसांमध्ये जवळपास ३५ व्यवहार पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे या व्यवहारासाठी आलेल्या पक्षकार, साक्षीदार यांनाही नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. 

36 दस्तऐवज तयार
तीन दिवसात खरेदी विक्री चे 20, गहन खत 15 आणि भाडेपत्र 1 असे 36 दस्तऐवज तयार करून पूर्ण झाली आहेत. मात्र हा व्यवहार केवळ इंटरनेट अभावी पूर्णत्वास जात नाही. 

नाहक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय
कार्यालयात मागील तीन दिवसांपासून व्यवहारासाठी ठाण मांडून बसलेल्या पक्षकारांनी यावर रोष व्यक्त केला. व्यवहार करण्यासाठी बाहेर गावाहून नातलग बोलवावे लागतात, त्यांच्या येण्याजाण्याचा, राहण्याचा खर्च तसेच ते कामे सोडून आलेली असल्याने त्यांचा ही वेळ वाया जातो अशी प्रतिक्रिया भास्कर कातारे (नाथरा,) ज्ञानोबा तुकाराम कोल्हे ,( उमरा) आणि संजय गुलाब पवार (मसला ) यांनी व्यक्त केली. 

पाठपुरावा सुरू आहे 
इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून व्यवहार बंद आहेत. बीएसएनएल कडे पाठपुरावा सुरू आहे.
- प्रकाश कुरुडे, दुय्यम निबंधक पाथरी

Web Title: Due to the discontinuation of internet service, the Pathari registrar offices work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.