पाण्याची आवक वाढल्याने येलदरी धरणाचे १० दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:35 PM2020-09-15T12:35:59+5:302020-09-15T12:39:41+5:30
येलदरीचे सर्व दरवाजे उघडून एकूण २७ हजार ७९० क्युसेक पाण्याचा विसर्ग
येलदरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने १४ सप्टेंबर रोजी या धरणाचे दहाही दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
यावर्षी आॅगस्ट महिन्यातच येलदरी धरण १०० टक्के भरले आहे. त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरु असल्याने येलदरीचे सर्व दरवाजे उघडून एकूण २७ हजार ७९० क्युसेक पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे ६० से.मी.ने उचलले. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता येलदरी प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणाखालील पूल पाण्याखाली गेलाhttps://t.co/pjh6Uwt0Ah
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 15, 2020
इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले
कळमनुरी (जि. हिंगोली) : इसापूर धरणातील पाणी पातळी वाढल्याने सोमवारी पहाटे तीन वाजता धरणाचे ९ दरवाजे ५० सें.मी.ने वर उचलण्यात आले. त्यातून पैनगंगा नदीपात्रात ४३२.४९१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.