कोरोना काळात सेलूकरांनी माणुसकीचा यज्ञ चालविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:43+5:302021-01-03T04:18:43+5:30
सेलू येथील पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने पेन्शन भवनमध्ये शुक्रवारी कोरोना योद्ध्यांचा कार्यगौरव व नूतन वर्षाभिनंदन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ...
सेलू येथील पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने पेन्शन भवनमध्ये शुक्रवारी कोरोना योद्ध्यांचा कार्यगौरव व नूतन वर्षाभिनंदन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनायकराव कोठेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, सीताराम मंत्री, अव्वल कारकून अनंत शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने नूतन वर्षाचे औचित्य साधून मागील वर्षी कोरोना राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, डॉ. संजय हरबडे, न.प.चे अशोक कासार, न.प. सदस्य मनीष कदम, आरोग्य सेवेबद्दल डॉ. प्रवीण जोग, डॉ. राजेंद्र मुळावेकर, विजय मांडके, उत्कृष्ट शेतकरी पंडितराव ताठे, वृत्तपत्र विक्रेते राम सोनवणे, पूनमचंद खोना, छायाचित्रकार सदाशिव महाजन, विकास अधिकारी उपेंद्र बेल्लूरकर, दामोधर काकडे, ई-सेवेबद्दल आनंद बाहेती, पोस्ट मास्तर राहुल लवंडे, संजय वीर, महिला मंडळ अध्यक्षा विजया कोठेकर, ललिता गिल्डा, शिक्षण क्षेत्रातील अनिल रत्नपारखी, सुभाष मोहकरे, अध्यात्मक्षेत्रातील शिवकुमार नावाडे, नाट्य व सांस्कृतिक प्रा. ए. डी. कुलकर्णी, संगीत क्षेत्रात गंगाधर कान्हेकर, व्यापारी सीताराम मंत्री, विश्वनाथ फरदखाने, गंगाधर हिवरे यांचा कार्य गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गंगाधर गळगे, आभार एन.एम. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पेन्शनर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.