वर्षभरात परभणीकरांनी खरेदी केली १७ हजार वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:04+5:302021-01-09T04:14:04+5:30

सर्वाधिक खरेदी नोव्हेंबर महिन्यात २०२० मध्ये दसरा व दिवाळी नोव्हेंबर महिन्यामध्ये होती. त्यामुळे या सणाच्या मुुहूर्तावर तसेच या महिन्यात ...

During the year, Parbhanikars bought 17,000 vehicles | वर्षभरात परभणीकरांनी खरेदी केली १७ हजार वाहने

वर्षभरात परभणीकरांनी खरेदी केली १७ हजार वाहने

Next

सर्वाधिक खरेदी नोव्हेंबर महिन्यात

२०२० मध्ये दसरा व दिवाळी नोव्हेंबर महिन्यामध्ये होती. त्यामुळे या सणाच्या मुुहूर्तावर तसेच या महिन्यात वाहन खरेदीस परभणीकरांनी सर्वाधिक पसंती दिली असल्याचे पहावयास मिळत आहे. या महिन्यात ३ हजार ६० नव्या वाहनांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ऑक्टोबर महिन्यात २ हजार ३५१,

मार्च महिन्यात २ हजार ९८६, सप्टेंबर २ हजार ८१, जानेवारीत २ हजार ४०, फेब्रुवारीत १ हजार ५४१, ऑगस्टमध्ये १ हजार ४१४, जुलैमध्ये १ हजार १६२, जूनमध्ये १ हजार १५६, तर एप्रिल महिन्यात ४२ नव्या वाहनांची नोंद झाली आहे.

२५ हजार शिकाऊ परवान्यांचे वितरण

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने २५ हजार ५८९ शिकाऊ परवाने देण्यात आले आहेत. तर ६ हजार ३२१ कायम परवाने, ८८९ परवान्याच्या दुय्यम नकला तर ७ हजार ९५५ परवान्यांचे नूतनीकरण या कार्यलायाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली.

Web Title: During the year, Parbhanikars bought 17,000 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.