चार वर्षांपासून शितशवपेटी धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:43+5:302020-12-28T04:09:43+5:30

तूर पीक उमळले बोरी : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बहुतांश तूर पीक शेतकऱ्यांच्या हातचे ...

The dustbin has been dusting for four years | चार वर्षांपासून शितशवपेटी धूळखात

चार वर्षांपासून शितशवपेटी धूळखात

Next

तूर पीक उमळले

बोरी : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बहुतांश तूर पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले. मात्र, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या हाती हे पीक लागले आहे. त्या शेतकऱ्यांनी या पिकावर मोठा खर्च करून जगवले. मात्र काढणीच्या वेळी हे पीक संपूर्णपणे उमळून गेले आहे.

१०० के.व्ही.चे १० रोहित्र धूळखात

परभणी : येथील वीज वितरण कंपनीच्या गोडाऊनमध्ये १०० केव्हीचे १० विद्युत रोहित्र मागील तीन महिन्यांपासून पडून आहेत. मात्र, हे विद्युत रोहित्र शेतकऱ्यांना न देता केवळ अत्यावश्यक सेवेसाठी ठेवण्यात आल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका विद्युत रोहित्रासाठी महिना-महिना थांबावे लागत आहे.

५६६ ग्रामपंचायतींमधील भावी सरपंचांना धक्का

परभणी : जिल्ह्यात मुदत संपलेल्या ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचप दाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी सरपंचपदासाठी तयारीही केली आहे. मात्र, राज्य शासनाने सरपंचपदाचे जाहीर केलेले आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे इच्छुक भावी सरपंचाच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.

६० हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील केवळ ६० हजार शेतकऱ्यांनीच पीकविमा भरला आहे. त्यामुळे विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबदला देऊन विमा कंपनीवरील शेतकऱ्यांचा विश्वास कायम ठेवावा.

विमा कंपनीकडून ११ कोटी रुपयांवर बोळवण

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जवळपास तीन लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने मदत देताना केवळ १० कोटी रुपयांची मदत देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची बोळवण केल्याचे दिसून येत आहे.

मुद्रा योजनेअंतर्गत ७१७ कोटींचे वाटप

परभणी : बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सुरू केलेल्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत पाच वर्षांत १ लाख ७ हजार ३८८ युवकांना २७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

अग्निशमन दलात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव

परभणी : शहरातील अग्निशमन दलामध्ये एकूण १३ कर्मचारी असून यापैकी केवळ एक कर्मचारी शासननियुक्त आहे. बाकीचे १२ कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपात आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. परिणामी या अग्निशमन दलात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

बसअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

देवगावफाटा : सेलू तालुक्यात दहावी व बारावीचे वर्ग सुरू होऊन पंधरा दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा व मानव विकास बस सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

तीन दिवसांतच दाखल करावा लागणार उमेदवारी अर्ज

देवगावफाटा : सेलू तालूक्यातील ६७ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी ३० निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्त केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना आपला ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज केवळ ३ दिवसांतच दाखल करावा लागणार आहे.

मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेत केवळ ७ प्रस्तावांना मंजुरी

देवगावफटा : स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवकाला रोजगारासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजना राबविली जाते. या योजनेत ४३ प्रस्तावांना पैकी केवळ ७ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

थकबाकी ४२५ कोटींची ; वसुली १५ कोटी

परभणी- वीज वितरण कंपनीचा १० उपविभागअंतर्गत अडीच लाख वीज ग्राहकांकडे ४२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा तुलनेत नोव्हेंबर महिन्यात केवळ ६० हजार ग्राहकांनी १५ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.

Web Title: The dustbin has been dusting for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.