ऊसाचा ट्रॅक्टर अन् क्रुझर गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 08:53 AM2023-12-17T08:53:33+5:302023-12-17T09:27:02+5:30

अपघातामधील क्रूझर गाडी आष्टी तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील आहे

Early morning accident involving sugarcane tractor and cruiser; Three deaths in parbhani pathari | ऊसाचा ट्रॅक्टर अन् क्रुझर गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

ऊसाचा ट्रॅक्टर अन् क्रुझर गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

विठ्ठल भिसे 

पाथरी -( जि परभणी)   पाथरी - आष्टी रस्त्यावर वडी पाटी जवळ शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास ट्रॅक्टर आणि क्रूझर गाडीचा  सामोरा समोर भीषण अपघात झाला यात 3 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत , अपघाता मधील क्रूझर गाडी परतूर तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील आहे, अपघात नंतर जखमी आणि मृत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीपी यंत्र वापरण्यात आला 
पाथरी हुन आष्टी कडे जाणारी क्रूझर गाडी आणि पाथरी कडे ऊस घेऊन येणारा ट्रॅक्टर यांच्या सामोरा समोर भीषण अपघात झाला, अपघातात क्रूझर गाडी ट्रॅक्टर च्या उसाच्या ट्रॉलीमध्ये घुसली त्यामुळे अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढणे अशक्य झाले होते घटनासळी तातडीने पोलीस दाखल झाले परिसरात मोठा जमावे झाला जखमी ना बाहेर काढण्यासाठी दोन जेसीपी यंत्राचा वापर करण्यात आला या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीरता जखमी झाले  आहेत ..

या अपघातात ठार झालेले तीन जण --अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके क्रुझर चालक वय 35 , अमोल मार्तंड सोळंके वय 34 दिगंबर भिकाजी कदम वय 30 सर्व राहणार ब्राहमणवाडी ता परतूर जी जालना, अपघातात गंभीर जखमी नाव, उमेश भरत सोळंके वय 27 संतोष कुंडलिक पांचाळ वय 35 अविनाश चंदू पाटील सोळंकेस दशरथ सुदाम काळे वय 25 किशोर कचरू सोळंके वय 34 आणि कृष्णा सोळंके वय 30 सर्व राहणार ब्राहामन वाडी ता परतूरचे रहिवाशी आहेत. 

अपघात झाल्या नंतर वडी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाले, मात्र क्रूझर गाडी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शिरल्याने जखमींना बाहेर काढणे शक्य झाले नाही घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाथरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पाथरी येथील शिवसेनेची रुग्णवाहिका   आणि शासकीय  108 अंबुलन्स घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी दोन जेसीपी यंत्र ही घटना स्थळी मागवली जेसीबी यंत्र आल्यानंतर जखमींना आणि मला त्यांना क्रुझर मधून बाहेर काढण्यात आले. अपघात नंतर   मृत्य व जखमी ला बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन ते अडीच  तास लागले,
 
देवदर्शन साठी येशवाडी येथे आले होते.
अपघात मधील कुझर गाडीतील सर्वच जण परतूर तालुक्यातील ब्राहमण वाडी येथील आहेत शनिवारी सर्व जण मानवत तालुक्यातील यशवाडी येथे दर्शन साठी आले होते दर्शन करून ते परत असताना अपघात झाला , 

पोलिसांकडून तातडी- 
अपघात घडल्या नंतर पाथरी पोलीस ठाण्यातिला सहायक पोलीस निरीक्षक एस डी भिकाने आणि रात्र पाळीवरील सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जखमी ला बाहेर काढण्यासाठी तातडीने जे सी पी यंत्र मागवली , उपस्थित नागरिकांच्या सहकार्य ने जखमी आणि मृत्यू  झालेल्या व्यक्ती ना बाहेर काढून उपचारासाठी हलवले

Web Title: Early morning accident involving sugarcane tractor and cruiser; Three deaths in parbhani pathari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.