चाऱ्यासोबत युरिया खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:26 PM2019-09-05T14:26:52+5:302019-09-05T14:28:57+5:30

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील घटना

Eating urea fertilizer along with food killed three animals in Parabhani | चाऱ्यासोबत युरिया खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावली

चाऱ्यासोबत युरिया खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावली

Next
ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांला फटका

जिंतूर - युरिया हे खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे गुरुवारी (दि. ५ ) सकाळी ६ वाजता घडली आहे.
पांगरी येथील शेतकरी धनंजय माधवराव घुगे यांच्या आखाड्यात चाऱ्यात युरिया पडला होता. हाच चारा खाल्ल्याने दोन बैल व एक गाय मृत्युमुखी पडले.

धनंजय घुगे यांनी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आखाड्यात पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.  घटनेने घुगे हे हादरून गेले आहेत. जिंतूर तालुक्यात सध्या दुष्काळ परिस्थिती आहे. त्यातच बैल जोडी व गाय मृत झाल्याने एक लाख ते दीड लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यास सहन करावे लागत आहे. 

दरम्यान, याच ठिकाणी युरिया खाल्ल्याने एक कारवडही अत्यवस्थ झाली होती. विस्तार अधिकारी  डॉ.केशव सांगळे व पांगरी येथील डॉ.पी. एम. भिसे, बंटी घोडके हे सकाळीच पांगरी येथे पोहोचले. त्यांनी केलेल्या उपचारांमुळे कारवडीस वाचविण्यात यश आले. यासाठी अशोक बुधवंत व इतर गावकरीही प्रयत्न केले.

Web Title: Eating urea fertilizer along with food killed three animals in Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.