खाद्यतेल १५ रुपयांनी स्वस्त, आता चमचमीत खा मस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:24+5:302021-09-27T04:19:24+5:30
परभणी येथे अकोला, लातूर तसेच हिंगोली आणि परराज्यातून तेल येेते. यासह शहरात शंभर ते दीडशे खाद्यतेल विक्रेते आहेत. ऑइल ...
परभणी येथे अकोला, लातूर तसेच हिंगोली आणि परराज्यातून तेल येेते. यासह शहरात शंभर ते दीडशे खाद्यतेल विक्रेते आहेत. ऑइल डेपो व किराणा भुसार येथे मिळणाऱ्या खाद्य तेलाचे दर कमी झाले आहेत. यासह पँकिंगच्या तेलाचे दरही कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यातील दरापेक्षा सप्टेंबर अखेरीस हे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
तेलाचे दर (प्रति लिटर)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १६० १५०
सूर्यफूल १९५ १७०
करडी २३० २३०
पाम तेल १४५ १३५
शेंगदाणा १९५ १८५
तीळ २१० २३०
म्हणून दूर झाले कमी
बाजारात नवीन सोयाबीन आता दाखल होत आहे. यामुळे सोयाबीन तेलाच्या दरात घसरण झाली आहे. लिटरमागे १० ते १५ रूपयांनी दर कमी झाले आहेत. सोयाबीन, पामतेल यांचे दर कमी झाले आहेत. सोयाबीन व पामतेल यांचे दर दिवसातून दोनदा कमी अधिक होतात. - व्यापारी, परभणी.
किराणा खर्चात बचत
मागील महिन्यात सणवार असल्याने किराणामध्ये सर्वाधिक खर्च खाद्यतेलावर झाला. यातच तेलाची एरव्हीपेक्षा जास्त खरेदी करावी लागली. यात दर वाढले होते. तेलाच्या दरावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. - रश्मी काळे.
सध्या दर कमी झाले असले तरी ते पुढील काळात नवरात्र, दिवाळीत कायम राहणे आवश्यक आहे. एन सणासुदीत महागाईने घरातील गृहिणींचे बजेट कोलमडते. एकदाच तेलाची साठवणूक केली जात नाही. - अस्मिता पाटील.
पँकिंगच्या तेलाचेही दर कमी
सध्या बाजारात एक किलो पँकिंगचे तेलाचे पाकिट मोठ्या प्रमाणावपर ग्राहक खरेदी करातात. त्यात सूर्यफूल व शेंगदाना, सोयाबीन यांना मागणी सर्वाधिक आहे. यात सोयाबीन १३५, सूर्यफूल १५० या दाराने मिळत आहेत.
करडी स्थिर तर तीळ वाढले
सध्या करडीच्या तेलाचे दर स्थिर आहेत. तर तीळाच्या तेलाचे दर जवळपास २० रुपये लिटरमागे वाढले आहे.