आयशर-ट्रकची समोरासमोर धडक; ताडकळस-पूर्णा मार्गावरील घटना; एक ठार, तिघे जखमी
By ज्ञानेश्वर भाले | Updated: November 24, 2023 22:46 IST2023-11-24T22:46:26+5:302023-11-24T22:46:54+5:30
ताडकळस ते पूर्णा जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाली.

आयशर-ट्रकची समोरासमोर धडक; ताडकळस-पूर्णा मार्गावरील घटना; एक ठार, तिघे जखमी
ज्ञानेश्वर भाले
परभणी : ताडकळस ते पूर्णा जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण ठार तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली. रात्री उशिरापर्यंत ताडकळस पोलीस घटनास्थळी मदतकार्यासह महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत होते.
पूर्णा-ताडकळस महामार्गावर रात्री साडेआठदरम्यान ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना पुढे आली. यात दोन्ही वाहनांचे समोरील बाजुने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आशयर वाहनाची केबीन सुद्धा पूर्णपणे चेंदामेंदा झाली होती. यात दोन्ही वाहनातील काही जणांचा जखमीमध्ये समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एक जण ठार झाल्याचे समजते. घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कपील शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे आणि कर्मचारी दाखल झाले होते. यात दोन्ही वाहनातील जखमींना परभणीत उपचारासाठी हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.