परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:19 AM2018-04-18T00:19:23+5:302018-04-18T00:19:23+5:30
जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक करणाºया रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी बाजार समितीचे संचालक गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी १७ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला़
नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी सकाळी ११ वाजता परभणी तालुक्यातील शेतकरी एकत्र आले. गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातून या मोर्चास सुरुवात झाली़ नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चा दरम्यान, शेतकºयांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते़
जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकºयांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकºयांनाच विम्याचा लाभ देत उर्वरित शेतकºयांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली. भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्र्चेकºयांच्या वतीने पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
आयआरडीएला पत्र पाठविणार - झळके यांचे आश्वासन
शेतकºयांच्या प्रश्नावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकºयांच्या शिष्टमंडळाच्या वतीने गणेशराव घाटगे यांनी पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याकडे दोन मागण्या आग्रहाने मांडल्या. त्यात जिल्ह्यातील ज्या ज्या गावांमधील शेतकºयांची फसवणूक झाली आहे. त्या सर्व शेतकºयांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पीक विम्या संदर्भात शेतकºयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पीक विमा संदर्भात शेतकºयांच्या तक्रारी वाढत असल्याचे आरयआरडीएला कळवावे, अशी मागणी केली. त्यावर पोलीस अधीक्षक झळके यांनी आयआरडीएला पत्र पाठविले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी गणेश घाटगे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यायालयीन लढ्याची तयारी
पीक विमा कंपनीने शेतकºयांची फसवणूक केली असून या कंपनीच्या विरोधात आंदोलन करुनही प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन लढा लढण्याची तयारी केली जाईल. यासाठी प्रत्येक घराघरातून तक्रारीचे अर्ज भरुन घेत कृषी विभागात ते दाखल केले जाणार आहेत. या अर्जांवरुन न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे, अशी माहिती गणेश घाटगे यांनी दिली.