कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:56+5:302020-12-28T04:09:56+5:30

सोनपेठ : सध्या नीचांकी तापमानामुळे कडाक्याची थंडी जाणवत असली तरीही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. सोनपेठ तालुक्यातील ...

Election battle even in the bitter cold | कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीची रणधुमाळी

कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीची रणधुमाळी

Next

सोनपेठ : सध्या नीचांकी तापमानामुळे कडाक्याची थंडी जाणवत असली तरीही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे.

सोनपेठ तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर गावागावातील पॅनल प्रमुख उमेदवार बघून त्यांना अत्यावश्यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करीत आहेत. यात त्यांची होत असलेली दमछाक आणि माणसांना भेटण्याचा सपाटा बघून निवडणुकांचा उकाडाच जणू गावातील नागरिक अनुभवत आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून यातून मोठमोठे नेते तयार झाल्याचा राजकीय इतिहास आहे. शिवाय पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने राज्य शासनाचा थेट निधी ग्रामपंचायतींना मिळू लागल्याने गावाचा सर्वांगीण विकास होऊ लागला आहे. गावाच्या विकासात फक्त माझाच वाटा असावा अशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहणाऱ्यांची मनोमन इच्छा झाल्याने आणि गावातील असलेल्या वेगवेगळ्या पक्षीय व गटातटाच्या राजकारणातील संघर्षाचा थेट परिणाम या गावांच्या निवडणुकांमध्ये पाहावयास मिळत आहे. यामुळे गावाच्या विकासासोबतच राजकीय पटलावरची सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितले जाते. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या होऊ लागल्या आहेत. यामुळे निवडणुकीतील साम-दाम-दंडभेद या सगळ्या अस्त्रांचा वापर या निवडणुकीत होत असल्याचे मागील काही निवडणुकांवरून लक्षात आले आहे. कडाक्याच्या थंडीचा बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोट्यांपासून ते गावातील प्रत्येक पारावर सध्या गरमागरम राजकीय चर्चांमुळे सामान्य माणूस ऐन थंडीतही राजकीय उकाडा अनुभवत आहे.

तालुक्यातून एकूण ३२९ सदस्य निवडले जाणार

सोनपेठ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील १२५ प्रभागांमधून ३२९ ग्रामपंचायतींचे सदस्य निवडले जाणार असून, यात एकूण ५०२४७ मतदार १२५ मतदान केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

तालुका प्रशासनाकडूनही जय्यत तयारी

ही निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे.

यासाठी ७०० कर्मचारी नेमले असून, यातील ५०० जण प्रत्यक्षात असतील, तर २०० कर्मचारी राखीव असणार आहेत.

१० निवडणूक निर्वाचन अधिकारी व १० सहायक निवडणूक अधिकारी धुरा सांभाळणार असून या सगळ्यांवर तहसीलदार डाॅ. आशिषकुमार बिरादार, ऐश्वर्या गिरी व नायब तहसीलदार अनिल घनसावंत विशेष लक्ष देऊन असणार आहेत.

Web Title: Election battle even in the bitter cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.