परभणीत रखडल्या सभापतींच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:03 AM2018-01-29T00:03:57+5:302018-01-29T00:04:06+5:30
महापालिकेच्या विषय समित्या निवडल्या खºया मात्र या समित्यांचे सभापती निवडण्यास विलंब लावला जात असल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेच्या विषय समित्या निवडल्या खºया मात्र या समित्यांचे सभापती निवडण्यास विलंब लावला जात असल्याने इच्छुकांची चलबिचल वाढली आहे.
महापालिकेचा कारभार चालविताना विविध विभागांमध्ये प्राधान्याने कामकाज व्हावे आणि या विभागातील समस्या सभागृहापुढे याव्यात या उद्देशाने विषय समित्या गठीत केल्या जातात. त्या त्या विभागातील समस्यांवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी विषय समित्यांच्या सभापतींचीही निवड होते. त्यामुळे मनपाच्या इतर पदाधिकाºयांबरोबरच विषय समित्यांनाही महत्त्व प्राप्त होते. मात्र परभणीत विषय समित्यांच्या सभापतींच्याच निवडी रखडल्या आहेत. त्यामुळे त्यामुळे सभापती पदासाठी इच्छुक असणाºया नगरसेवकांची उत्सूकता ताणली जात आहे. शिवाय विकासकामांनाही गती मिळत नसल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१७ मध्ये महापालिकेचा कारभार नवीन पदाधिकाºयांच्या हाती आला. त्यानंतर तब्बल ८ महिन्यानंतर मनपाच्या विषय समित्यांची निवड करण्यात आली. ४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत निवडलेल्या विषय समित्यांवर सर्वच पक्षांच्या सदस्यांना स्थान देण्यात आले. मात्र अजूनही विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली नाही. महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, बांधकाम, शहर सुधार, न्याय व विधी अशा सात समित्यांचे सात सभापती पदे रिक्त आहेत. सभापतींच्या निवडीसाठी विलंब केला जात असल्याने इच्छुकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. तेव्हा मनपाची सर्वसाधारण सभा तातडीने घेऊन सभापती पदाच्या निवडी कराव्यात, अशी मागणी होत आहे.
स्वीकृत सदस्याचे पदही रिक्त
महापालिकेत स्वीकृत सदस्याची पाच पदे असून, त्यापैकी राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याच्या स्वीकृत सदस्याची सर्वप्रथम निवड झाली. डिसेंबर महिन्यात भाजपाचा एक आणि काँग्रेसच्या दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. एका स्वीकृत सदस्याचे पद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्याची निवड करण्यासाठीही तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी होत आहे.