वीज बिल वसुली घातली खिशात; महावितरणच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 19, 2023 07:23 PM2023-04-19T19:23:12+5:302023-04-19T19:23:45+5:30
महावितरणकडून शहरात थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.
पाथरी (जि. परभणी) : वीज ग्राहकांची थकीत वीज बिल वसुली करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच वीज बिल वसुलीमधील ८४ हजार ५०० रुपयांच्या वसुली रकमेवर डल्ला मारला आहे. ही बाब उघड झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणकडून शहरात थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. मार्च अखेर असल्याने वसुलीसाठी महावितरण प्रशासनाने वेगवेगळे पथक तयार करून वसुली मोहीम हाती घेण्यात आली होती. या पथकातील कर्मचारी वसुलीसाठी शहरातील वीज ग्राहकांच्या घरी जाऊन बिलाची वसुली करत होते. यात वरिष्ठ तंत्रज्ञ रवी संदीप अवचार यांनी २५ ते २८ मार्च या काळात ग्राहकांकडील थकीत बिलापोटी वसूल केलेली ८४ हजार ५२० रुपयांची रक्कम महावितरणकडे भरलीच नाही. दरम्यान, वीज बील रकमेत अपहार झाल्याचे महावितरणच्या लक्षात आल्यानंतर महावितरणचे अधिकारी डी. बी. भोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी रवी अवचार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बी.आर. बंदखडके करत आहेत.