परभणी जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या कामांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:44 PM2020-02-09T23:44:27+5:302020-02-09T23:45:12+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या कामांवर भर दिला जात असून, मागील दोन महिन्यांपासून सिंचन विहीर आणि घरकुलांची कामे वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या कामांवर भर दिला जात असून, मागील दोन महिन्यांपासून सिंचन विहीर आणि घरकुलांची कामे वाढली आहे. सद्यस्थितीला २९० वैयक्तिक लाभाची कामे सुरु करण्यात आली आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मजुरांना काम उपलब्ध करुन दिले जाते. यासाठी मनरेगाकडे मोठ्या प्रमाणावर मजुरांची नोंदणीही झाली आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून मनरेगा अंतर्गत कामांची संख्या मर्यादित स्वरुपात असल्याने या कामांवर काम करणाऱ्या मजुरांची संख्याही मर्यादित असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी रब्बी हंगामामध्ये पाण्याची मूबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध असून शेतात कामे वाढल्याने मजुरांनी मनरेगाच्या कामांकडे पाठ फिरवली आहे. असे असले तरी जिल्ह्यामध्ये ३६६ कामे सुरु असून त्यात वैयक्तिक स्वरुपाची कामे सर्वाधिक आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी कामे हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेला घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले असून रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेची कामे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याच कामांचा मनरेगामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. घरकुल बांधकाम करणाºया लाभार्थ्यांना मजुरांचे देयके मनेरगाच्या माध्यमातून अदा केली जात आहेत. जिल्ह्यात घरकुल बांधकामाची १२० कामे सुरु असून वैयक्तिक विहिरींची २१ कामे सुरु आहेत. ही दोन्ही कामे वैयक्तिक लाभाच्या कामात मोडतात. त्यामुळे मनरेगा अंतर्गत घरकुल बांधकाम आणि सिंचन विहिरीच्या कामातून मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे; परंतु, सार्वजनिक कामांची संख्या मात्र वाढत नसल्याने जिल्ह्यात चिंतेची बाब ठरत आहे. जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ता, रोपवाटिका, वृक्ष लागवड, शेततळे, व्हर्मी कंपोस्ट अशी विविध कामे केली जात असली तरी मागील आठवड्यात यापैकी एकही काम सुरु नव्हते. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या कामांबरोबरच सार्वजनिक कामेही सुरु करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर उभे राहिले आहे.
जिंतूर तालुक्यात घरकुलाची २८ कामे
४रमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात घरकुल बांधकामाची १२० कामे रोहयो अंतर्गत सुरु आहेत. त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधिक २८ घरकुल बांधकाम होत आहेत. त्याचप्रमाणे सेलू तालुक्यामध्ये २१, पालम १९, परभणी १६, पूर्णा १५, सोेनपेठ ११ आणि मानवत व पाथरी तालुक्यात प्रत्येकी ५ घरकुलांची कामे सुरु आहेत.
४याशिवाय वैयक्तिक विहिरींची २१ कामे केली जात आहेत. त्यात पूर्णा आणि सेलू तालुक्यात प्रत्येकी ५, पाथरी ४, मानवत, परभणी आणि सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी २ तर जिंतूर तालुक्यात विहिरीचे १ काम सुरु आहे.
४याशिवाय सार्वजनिक विहिरीची ७६ कामे सुरु असून त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १६, गंगाखेड १२, मानवत १४, पूर्णा १६, पालम, सेलू प्रत्येकी ३, परभणी १० अािण सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी सार्वजनिक विहिरीचे काम सुरु आहे.
३ हजार मजुरांना काम
४मागील आठवड्यात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३ हजार १६० मजुरांना काम मिळाले आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यात पूर्णा तालुक्यात ७०५ मजुरांच्या कामाला मिळाले आहे.
४त्या खालोखाल परभणी तालुक्यात ६७६, जिंतूर ५३६, मानवत ४२३, गंगाखेड २३६, पाथरी १७३, पालम १५४, सेलू १५८ आणि सोनपेठ तालुक्यात ९९ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
पूर्णा तालुक्यात सर्वाधिक कामे
४जिल्ह्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या कामांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. एकूण ३६६ कामे सुरु असून त्यात २९० कामे वैयक्तिक लाभाची आहेत.
४ पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ८९ कामे सुरु आहेत. त्यात ७३ वैयक्तिक स्वरुपाची आणि १६ कामे सार्वजनिक स्वरुपाची आहेत. जिंतूर तालुक्यात वैयक्तिक स्वरुपाची ४०, मानवत तालुक्यात ४२.
४पालम १९, परभणी ६०, पाथरी १७, सेलू २६ आणि सोनपेठ तालुक्यात १३ कामे सुरु आहेत. तर दुसरीकडे सार्वजनिक स्वरुपाची सर्वाधिक कामे जिंतूर आणि पूर्णा या तालुक्यात सुरु आहेत.