सोयाबीन विकून महिना झाला तरी मानवतच्या शेतक-यांना पैसे मिळेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 04:22 PM2017-12-13T16:22:58+5:302017-12-13T16:29:48+5:30
केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. यामुळे खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
- विठ्ठल भिसे
पाथरी : केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. यामुळे खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री करून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
राज्य शासनाने या वर्षी केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने एफएकयु प्रतीचे सोयाबीन ,मूग ,उडीद खरेदी करण्यासाठी हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले. सोयाबीन साठी 3 हजार 50 रुपये तर मूग साठी 5 हजार 575 रुपये हमी दर जाहीर केला, खरेदी केंद्रावर शेतमाल आणण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची बाजार समिती आणि खरेदी विक्री संघ स्तरावर ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली. त्यानंतर मोबाईल एसएमएस वरून शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या अधिनस्थ नाफेडमार्फत पाथरी आणि मानवत तालुक्यासाठी मानवत येथे किमान आधारभूत दराने खरेदी केंद्र सुरू करण्यात आले, मानवत मार्केट यार्डात 13 नोव्हेंबर रोजी खरेदी विक्री संघाच्या वतीने खरेदी सुरू झाली. मात्र, खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी मात्र 2200 ते 2400 रुपये की सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केली, अगोदरच सोयाबीन ला उतारा कमी त्यात भाव नसल्याने शेतकरी यात भरडला गेला.
694 शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी
मानवत येथील किमान आधारभूत दाराच्या खरेदी केंद्रावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील 693 शेतकऱ्यांनि आपला शेतमाल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे यात 497 शेतकरी सोयाबीन , तर 197 शेतकरी मूग विक्री साठी नोंदणी झाली आहे.
महिना झाला तरी पैसे जमा नाहीत
खरेदी केंद्र सुरू होऊन एक महिना लोटला आहे.या दरम्यान 720 किलो सोयाबीन आणि 142 की मूग अशी 30 लाख रुपयाची खरेदी येथे झाली.मात्र, आठवड्यात पैसे खात्यात जमा होणार असे जाहीर केले असताना आज महिना झाला तरी एक रुपयाही शेतक-यांच्या खात्यात जमा झाला नाही.
12 लाख निधी उपलब्ध
मानवत खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या शेतमालाची 12 लाख 85 हजार 900 रुपये रक्कम 12 डिसेंबर रोजी प्राप्त झाली आहे. रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.
- माणिक भिसे, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ मानवत
आधीच अडचण त्यात आणखी फसगत
सोयाबीनला उतारा नव्हता आता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. यातच सोयाबीन विक्री करून २० दिवस झाले तरी याची रक्कम अजूनही मिळाली नाही. यामुळे मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे
- उद्धव भिसे, शेतकरी, कोल्हावाडी