तीन फेऱ्यानंतरही शासकीय कोट्यातील जागा रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:23+5:302020-12-23T04:14:23+5:30

डी.एल.एड. प्रवेशासाठी राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. मात्र ...

Even after three rounds, the government quota is still vacant | तीन फेऱ्यानंतरही शासकीय कोट्यातील जागा रिक्तच

तीन फेऱ्यानंतरही शासकीय कोट्यातील जागा रिक्तच

Next

डी.एल.एड. प्रवेशासाठी राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. मात्र जिल्ह्यात डीएलएडच्या १२०० जागा उपलब्ध आहेत. मात्र तीन फेऱ्यांमध्ये आतापर्यंत केवळ ११६ जणांचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. डी.एल.एड.कडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत. शासकीय कोट्यातील जागा भरण्यासाठी आता विशेष ऑनलाईन फेरी सुरू करण्यात आली आहे. २२ ते २६ डिसेंबर या काळात विद्यार्थ्यांना डी.एल.एड प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. खुल्या संवर्गासाठी ४९.५ टक्के आणि इतर संवर्गासाठी ४४.५ टक्के किमान गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. तेव्हा या विशेष फेरीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समितीच्या अध्यक्षांनी केले आहे.

Web Title: Even after three rounds, the government quota is still vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.