परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील घटना :सिलिंडरच्या स्फोटात घरातील साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:14 AM2017-12-31T00:14:49+5:302017-12-31T00:16:10+5:30
येथील मौलाना आझाद कॉलनीत २९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
५० हजारांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : येथील मौलाना आझाद कॉलनीत २९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
येथील मौलाना आझा कॉलनी परिसरातील गुलाबराव गणपतराव नेटके हे आपल्या कुटुंबियांसमवेत किरायाने राहतात. घरातील गॅस संपल्याने गॅस एजन्सीच्या कामगाराने नेटके यांना नवीन सिलिंडर आणून शेगडीला लावूनही दिले. काही वेळानंतर नंदा गुलाब नेटके यांनी गॅस शेगडी पेटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिलिंडरने पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण घरात गॅस पसरला. गॅसने पेट घेतल्याचे पाहताच नंदा नेटके ह्या स्वयंपाक घरातून बाहेर पळाल्या. तेवढ्यात सिलिंडरचा स्फोट होऊन घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, टी.व्ही., घरावरील पत्रे जळून खाक झाले. शेजारच्या युवकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अग्नीशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले. अग्नीशमन विभागाचे मुजाहेद बेग मिर्झा, चतरु राठोड, रोहीत जाधव, बाबाराव रोकडे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.