पोकरा अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:25+5:302021-02-17T04:22:25+5:30
पालम तालुक्यातील पेठशिवणी येथेे १५ फेेेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ढोबळी मिरची पिकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत ...
पालम तालुक्यातील पेठशिवणी येथेे १५ फेेेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ढोबळी मिरची पिकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होतेे. परभणी जिल्हा कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यावतीने सर्व प्रमुख कृषी अधिकारी यांनी १५ फेब्रुवारी रोजी पालम तालुक्यातील आठ गावांतील शेत-शिवार दौरा अंतर्गत पीक पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अंजनवाडी, पेठ शिवनी, सातेगाव आदी गावात भेट दौरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कृषी अधिकारी मंचक शिनगारे, भगवान करंजे यांनी आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालम तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेमा शेटे यांनी मानले. यावेळी परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.