अतिवृष्टीने खरिपाची पिके वाया गेली, कर्जमाफीची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:23+5:302021-01-01T04:12:23+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी घोडेबाजार गंगाखेड : उमेदवारी भरण्यासाठीची तारीख संपली असून १ हजार ६७६ उमेदवारी अर्ज दाखल झाले ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी घोडेबाजार
गंगाखेड : उमेदवारी भरण्यासाठीची तारीख संपली असून १ हजार ६७६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेतील उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी घोडेबाजार सुरू झाला आहे. सध्या गावातील चावडीवर निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गावा-गावात अनेकांकडून प्रयत्न होणार असल्याचे दिसते.
तंटामुक्ती योजना प्रभावी करण्याची गरज
गंगाखेड : ग्रामपंचायत निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी, यासाठी गावात स्थापन केलेली तंटामुक्ती गाव समिती सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावातील तंटे गावात मिटवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रत्येक ठिकाणी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना केली. मात्र मागच्या काही दिवसांपासून या समित्यांचे काम थंड झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तंटे वाढण्याची शक्यता असल्याने या समित्या प्रभावी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्मचाऱ्याची नियुक्ती करा
गंगाखेड : शहरातील शिवाजी चौकात पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. संक्रांतीनिमित्त महिला वर्ग मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारात येतात. शिवाजी चौक भागात मुलांचे टोळके नेहमीच थांबलेले असते. तसेच गर्दी वाढल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. तेव्हा येथील पोलीस चौकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सम विषम पार्किंगचा बोजवारा
गंगाखेड : गंगाखेड शहरात नगरपालिकेने सम विषम तारखेनुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला पार्किंगची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही सुविधा बंद पडली आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांची कोंडी निर्माण होत आहे. काही दुचाकीस्वारच हा नियम मोडत आहेत. तेव्हा पाच वर्षांपूर्वी कार्यान्वित केलेली सम-विषम पार्किंग सुविधा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.