खळबळजनक ! एकाच घरातील तिघांचा गळा चिरला, पती-पत्नीचा मृत्यू, मेव्हणी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:34 AM2022-03-16T10:34:14+5:302022-03-16T10:35:15+5:30

घरातून एका महिलेचा वेदनेने विव्हळत असल्याचा आवाज शेजार्‍यांना आला आणि हे खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले

Exciting! Three of them were strangled in the same house, husband and wife were killed and sister-in-law was seriously injured | खळबळजनक ! एकाच घरातील तिघांचा गळा चिरला, पती-पत्नीचा मृत्यू, मेव्हणी गंभीर जखमी

खळबळजनक ! एकाच घरातील तिघांचा गळा चिरला, पती-पत्नीचा मृत्यू, मेव्हणी गंभीर जखमी

Next

असोला (जि. परभणी): परभणी तालुक्यातील आसोला येथे धारदार शस्त्राने तिघांचा गळा चिरल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून यातील पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

परभणी तालुक्यातील आसोला येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात शंकर ग्‍यानोजी राक्षे यांचे घर आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता शंकर रिक्षे यांच्या घरातून एका महिलेचा वेदनेने विव्हळत असल्याचा आवाज शेजार्‍यांना आला. त्यामुळे शेजाऱ्यांनी आत पाहिले असता शंकर ज्ञानोजी रिक्षे(६५ वर्षे), शारदा शंकर रिक्षे (६०) हे पती पत्नी व गिरजाबाई गोविंद अडकिने ( ५८ वर्षे, रा. दारेफळ, ता. वसमत, जि. हिंगोली) या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे ताडकळस पोलिसांना तातडीने याबाबतची माहिती देण्यात आली. 

त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या पाहणीत तिघांचाही गळा चिरल्याचे दिसून आले. यात शंकर रिक्षे व शारदा रिक्षे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे तर  गिरजाबाई अडकिने या गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सारजाबाई यांना तातडीने परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे. घटनास्थळी ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामोड यांनी भेट दिली. श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, शारदा रिक्षे व गिरजाबाई अडकिने या सख्ख्या बहिणी असल्याचे समजते. गिरजाबाई या मंगळवारीच आसोला येथे बहिणीला भेटण्यासाठी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

Web Title: Exciting! Three of them were strangled in the same house, husband and wife were killed and sister-in-law was seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.