पीकविम्याच्या अग्रीम रकमेतून दोन मडलांना वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:23 AM2021-09-08T04:23:09+5:302021-09-08T04:23:09+5:30
परभणी जिल्ह्यातील २३ मंडलांसह पालम तालुक्यातील तीन महसूल मंडलास पीक विम्याची अग्रीम रक्कम जाहीर झाली. त्यात तीन आठवडे पावसात ...
परभणी जिल्ह्यातील २३ मंडलांसह पालम तालुक्यातील तीन महसूल मंडलास पीक विम्याची अग्रीम रक्कम जाहीर झाली. त्यात तीन आठवडे पावसात खंड नाही. म्हणून रावराजूर व पेठशिवणी महसूल मंडलाला विम्यापासून वगळण्यात आले. वास्तविक रावराजूरमध्ये २३, तर पेठशिवणी मंडलात २२ दिवसांचा खंड पडला होता. तरीही या मंडलात पाऊस पडल्याचा अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालय, केंद्र आणि स्थानिक पर्जन्यमापकाची आकडेवारी घेऊन दिला. मुळात २४ जुलै ते १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान पालम तालुक्यात कोठेही पाऊस पडला नाही. तरीही रावराजूर मंडलात ७ ऑगस्ट रोजी ३.५ मिली, तर पेठशिवणी मंडलात ५.३ मिलीची नोंद कशी झाली? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. दुसरीकडील महसूल मंडलांना २१ दिवसांच्या खंडामुळे अग्रीम रक्कम जाहीर केली. त्या मंडलातदेखील पावसाची नोंद आढळते. प्रामुख्याने १ ते १५ ऑगस्ट दरम्यान पालममध्ये ६, तर बनवसमध्ये ७ मिली पाऊस झाला. मग या मंडलासोबत रावराजूर व पेठशिवणीदेखील विम्याच्या अग्रीम रकमेसाठी पात्र होती. तरीही नेहमीप्रमाणे या दोन मंडलांवर प्रशासनाच्या वतीने अन्याय करण्यात आला आहे.
रावराजूर मंडलात झालेला पाऊस
जुलै : २३- ०.५, २४- ०.८, २५-०, २६-०, २७-०, २८-०, २९-०, ३०-०,३१-०.३
ऑगस्ट : १-०.८, २-०, ३-०, ४-०, ५-०, ६-०, ७-३.५, ८-०, ९-०, १०-०.५, ११-०, १२-०,१३-०.८, १४-०, १५-०.
पेठशिवणी:
जुलै : २५-०, २६-०,२७-०, २८-०, २९-०, ३०-०, ३१-०.
ऑगस्ट : १-१.५, २-०, ३-०, ४-०, ५-०,६-०, ७-५.३, ८-०, ९-०, १०-१.५, ११-०, १२-०, १३-०,१४-०, १५-०.
तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी नॉट रिचेबल
पालम तहसीलदार प्रतिभा गोरे आणि तालुका कृषी अधिकारी देशमुख यांना फोन केला असता त्यांचे फोन बंद होते. या दिवशी पालम तालुक्यातील सर्व नद्या, ओढे नाल्यांना पूर होता. अशा आपत्तीच्या काळातदेखील जबाबदार अधिकाऱ्यांनी फोन बंद करून ठेवले. त्यावरून ते किती बेजबाबदार असतील, हे लक्षात येते.