परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:04+5:302021-09-09T04:23:04+5:30

सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. अनेक मार्ग ठप्प असून, गावांमध्ये पाणी ...

Extreme rainfall in six talukas of Parbhani district | परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अतिवृष्टी

Next

सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. अनेक मार्ग ठप्प असून, गावांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. महसूल प्रशासनाने मंगळवारी झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक १०६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गंगाखेड तालुक्यात १०० मिमी, पालम १०३ मिमी, सोनपेठ ६७.९, परभणी ६७.७ आणि मानवत तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५२ मंडळे असून, त्यापैकी २७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पालम तालुक्यातील पेठशिवणी मंडळात सर्वाधिक १५३.५ मिमी पाऊस झाला आहे.

अतिवृष्टी झालेली मंडळे कंसात झालेला पाऊस मिमीमध्ये

पेडगाव (८४), दैठणा (९३.८), पिंगळी (७९), परभणी ग्रामीण (९१.५), गंगाखेड (१४४), माखणी (१०१.८), राणीसावरगाव (९९.३), पिंपळदरी (९२), पाथरी (१५६.८), बाभळगाव (१०८), हादगाव (८२.३), कासापुरी (७६.८), पूर्णा (१३८.५), ताडकळस (११३), लिमला (८३), पालम (१२५), चाटोरी (९२.३), बनवस (८६), रावराजुर (१५३.५), सेलू (७४.५), सोनपेठ (९१.८), शेळगाव (७२.८), मानवत (८२.८), केकरजवळा (८९.८), ताडबोरगाव (६७.५). रामपुरी (६७.५).

Web Title: Extreme rainfall in six talukas of Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.