मालमत्तेसाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र; दोन ग्रामसेवक, सरपंचासह आठ जणांवर गुन्हा

By ज्ञानेश्वर भाले | Published: December 8, 2023 03:57 PM2023-12-08T15:57:28+5:302023-12-08T15:58:04+5:30

सेलू न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल; दोन ग्रामसेवक व सरपंच यांचा आरोपीमध्ये सामावेश.

fake death certificate for property; Crime against eight persons including two gram sevak, sarpanch | मालमत्तेसाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र; दोन ग्रामसेवक, सरपंचासह आठ जणांवर गुन्हा

मालमत्तेसाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र; दोन ग्रामसेवक, सरपंचासह आठ जणांवर गुन्हा

सेलू (जि.परभणी) : वडिलांच्या मृत्यू पश्चात गृह मालमत्तेवर ताबा मिळविण्यासाठी न्यायप्रविष्ट प्रकरणात वडिलांना तिन पत्नी दाखवून दोन पत्नीचे सरपंच व दोन ग्रामसेवकांकडून बनावट मृत्यू प्रणाणपत्र काढल्याप्रकरणी सेलू न्यायालयाच्या आदेशानंतर सेलू पोलीस ठाण्यात ५ डिसेंबर रोजी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन ग्रामसेवक व सरपंच यांचा सामावेश असल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

घटनेची हकीगत अशी की,अर्जदार तथागत आवचार यांचे वडील ज्ञानोबा आवचार हे पोष्ट खात्यात ३१ मार्च २०१० रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचे निधन १८ जुन २०१६ रोजी झाले.त्यानंतर पत्नी म्हणजे अर्जदार यांची आई चतुराबाई ज्ञानोबा आवचार ह्या आत्तापर्यंत पेन्शन चा लाभ घेत आहेत. मात्र श्रीराम कॉलनी सेलू येथील गृह मालमत्ता क्रं ३७/१ सर्वे.नं.२४९ यावर हक्क प्रकरणी वडीलांची दुसरी पत्नी शांताबाई व तिसरी पत्नी चतूराबाई यांचे वारस तर्फे गंगाधर आवचार ,दिपक आवचार व ईतरांनी तथागत आवचार यांचे विरूध्द प्रकरण सेलू न्यायालयात सुरू असतांना ग्रामसेवक प्रदिप जरवाल,सरपंच किशोर कारके,ग्रामसेवक व्हि.डब्ल्यू.हीलगीरे यांचेकडून चतुरा आवचार यांचा मृत्यू १६ ऑगस्ट १९८० तर शांता आवचार यांचा मृत्यू १५ जुलै १९९० रोजी झाला असे मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात दाखल केले.

त्यानंतर तथागत आवचार याने हे मृत्यू प्रमाणपत्र बनावट आहेत.केवळ पेन्शनधारक माझी आई हीच एकमेव वारसदार आहे.  याबाबत लेखी पुराव्यासह ३ मार्च २०२३ रोजी सेलू न्यायालयात १५६(३) अंतर्गत फिर्याद दाखल केली.अर्जदार यांचे वतीने हायकोर्टाचे अँड उध्दव जाधव यांनी युक्तीवाद केला.अर्जदार व गैरअर्जदार कडील दोन्ही बाजुंच्या विधीज्ञांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या.मंदार राऊत यांनी अर्जदार यांची फिर्याद मंजूर केली.

सेलू पोलीस निरीक्षक यांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सादर करण्याबात निर्देश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांचे आदेशानुसार गंगाधर अवचार, दिपक अवचार, अशोक अवचार,माया मस्के, ज्योती भदरगे,गोमेवाकडीचे ग्रामसेवक प्रदीप जारवाल,सरपंच किशोर कारके,ग्रामसेवक व्ही. डब्लु. हीलगीरे या आरोपींनी संगणमताने बनावट दस्तएवज तयार करून रविवारी सुटीच्या दिवशी खोट्या नोंदी घेवुन फिर्यादीची फसवणुक केली आहे म्हणुन सेलू पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये ८ जणांवर ५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.पोउपनी अशोक जटाळ हे तपास करीत आहेत.

Web Title: fake death certificate for property; Crime against eight persons including two gram sevak, sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.