परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:03 AM2019-01-28T01:03:40+5:302019-01-28T01:04:08+5:30

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.

Farbani district's Fardad-free campaign on paper | परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

परभणी जिल्ह्यात फरदडमुक्त अभियान कागदावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने राबविलेले फरदडमुक्त गाव अभियान कागदावरच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील केवळ २ गावांमध्ये ७० ते ८० टक्के अभियान यशस्वी झाल्याचे कृषी विभागाचेच म्हणणे असल्याने उर्वरित गावांमध्ये या अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
कापूस हे जिल्ह्यातील नगदी पीक म्हणून ओळखले जाते. सर्वच शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र दोन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव उद्भवत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. २०१७ च्या हंगामात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला.
१ ते २ वेचण्या झाल्यानंतर कापसाच्या झाडाला पाने, फुले लागत नव्हती. त्यामुळे सर्वच पीक बोंडअळीच्या प्रादूर्भावाने वाळून जात होते. २०१८ च्या हंगामातही हीच परिस्थिती निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले, त्यापैकी बहुतांश शेतकºयांच्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला.
बोंडअळीचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यासाठी कापसाचे पºहाटी उपटून काढणे हा शास्त्रोक्त पर्याय असून कृषी विभागाने यासाठी विशेष अभियान राबविले. गावा-गावात जावून कापूस पिकातील फरदड उपटून काढण्याची मोहीम राबविली.
यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अपेक्षित होते. कृषी विभागातील अधिकाºयांनी गावा-गावात जाऊन शेतकºयांना या अभियानाचे महत्त्व पटवून दिले असते तर मोठ्या प्रमाणात गावे फरदडमुक्त झाली असती. मात्र हे अभियान कागदोपत्रीच राबविल्याने अनेक गावांमध्ये फरदडमुक्ती झाली नाही. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादुर्भाव उद्भवण्याचा धोका कायम असल्याचे दिसत आहे.
१५ हजार हेक्टरवरच नवीन पिके
कृषी विभागाने १४ नोव्हेंबर २०१८ पासून फरदडमुक्त गाव अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाचा लेखाजोखा देणारी माहिती कृषी विभागाने तयार केली आहे. जिल्ह्यामध्ये १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. त्यातील १ लाख ७० हजार हेक्टर कोरडवाहू तर १९ हजार ८६९ हेक्टर बागायती पिकामध्ये मोडते. कापसाची लागवड १ लाख हेक्टरवर झाली असली तरी प्रत्यक्षात कापूस फरदड काढल्याने रिकाम्या झालेल्या केवळ १५ हजार हेक्टरवर रब्बी हंगामामध्ये हरभरा, ज्वारीची लागवड करण्यात आली. तर परभणी तालुक्यातील सूरपिंपरी आणि सोन्ना ही दोनच गावे ७० ते ८० टक्के फरदडमुक्त केल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे इतर गावांमध्ये राबविलेल्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
घडी पत्रिकांतून जनजागृती
बोंडअळीचा प्रश्न गंभीर असतानाही प्रत्यक्ष शेतावर जावून जनजागृती झाली नाही. शेतकºयांना फरदडमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी शेतकºयांशी संवाद साधणे अपेक्षित होते.मात्र केवळ घडी पत्रिकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुमारे ५ हजार घडीपत्रिका जिल्ह्यामध्ये वाटप केल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात गावोगावी जावून फरदडमुक्ती केली असती तर बोंडअडळीचा धोका कमी झाला असता; परंतु, कागदोपत्री अभियान राबविल्याने पुढील वर्षीच्या हंगामातही बोंडअळीचा प्रादूर्भाव होण्याची भिती निर्माण झाली आहे.

Web Title: Farbani district's Fardad-free campaign on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.