कर्जासाठी उपोषणाला करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 02:22 AM2018-12-14T02:22:31+5:302018-12-14T02:22:51+5:30

शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, या मागणीसाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर उपोषणास बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे (३५) या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Farmer death for fasting loan | कर्जासाठी उपोषणाला करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

कर्जासाठी उपोषणाला करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

Next

परभणी : शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, या मागणीसाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर उपोषणास बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे (३५) या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या शेतकºयांनी मृतदेह बँकेच्या दारात ठेवला असून उशिरापर्यंत तणाव कायम होता. संतप्त शेतकºयांनी रास्ता रोको केल्याने सेलू, माजलगावकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेने शेतकºयांना कर्जाचे वाटप करण्यासाठी अनेकांच्या फाईली घेऊनही त्यांना कर्जपुरवठा केला नाही. त्यामुळे १२ डिसेंबरपासून शेतकरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी बँकेसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आंदोलनाच्या दुसºया दिवशी उपोषणार्थी शेतकरी काळे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Farmer death for fasting loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.