सेलू तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 08:17 PM2019-03-01T20:17:27+5:302019-03-01T20:18:54+5:30
आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आली.
सेलू (परभणी ) : तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील सुनिल श्रीरंग गाढे ( वय ४८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. गाढे मुळचे माजलगाव ( जि.बीड ) तालुक्यातील सरवळ पिंपळगाव येथील रहिवासी होते.
सुनील गाढे यांना सरवळ पिंपळगाव येथे अडीच एक्कर शेत जमीन होती. शेतातील सततची नापिकी व बॅकेचे कर्ज कसे फेडावे या विवेंचनेतून ते असत. यातच सोमवारी कामानिमित्त पुण्याला जात असल्याचे त्यांनी घरी सांगितले होते. मात्र, आज शुक्रवारी सकाळी कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलांना त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीपान शेळके व बीट जमादार सुधाकर शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी सेलू पोलिसात नोंद घेण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.