मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 03:55 PM2018-09-24T15:55:54+5:302018-09-24T15:57:02+5:30

शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८ शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही.

Farmer Sukanu Committee's agitation demanded the amount of tired money at Manavat | मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन

मानवत येथे थकीत रक्कमेच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे आंदोलन

Next

मानवत (परभणी ) : शासकीय हमीभाव केंद्रावर तुर, हरभरा विक्री केलेल्या ५२८  शेतकऱ्यांना अद्याप याची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी आज दुपारी शेतकरी सुकाणू समितीने खरेदी विक्री संघ कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. 

हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री केलेल्या ४६८ शेतकऱ्यांचे ६ हजार २०८ क्विंटल चे २ कोटी ६२ लाख १९ हजार रुपये व तुर विक्री केलेल्या ६० शेतकऱ्यांचे ४६ लाख २६ हजार रुपये थकले आहेत. विदर्भ कॉ. फेडरेशनकडे ही रक्कम थकीत आहे. याचे त्वरित वितरण करावे या मागणीसाठी आज दुपारी सुकाणू समितीने धरणे आंदोलन सुरु केले.  या आंदोलनात  लिंबाजी कचरे पाटील, बाळासाहेब आळणे, आशोक बारहाते, रामराजे महाडीक, बाबासाहेब अवचार, पांडूरंग मुळे, यांच्यासह विष्णु जाधव, देविदास शिंदे, वसंत राव शिंदे, त्रिंबकराव सुरवसे, गणेश शिंदे, उद्धवराव काळे, रमेश साठे, माउली निर्वळ, शंकर भिसे, मोहन जाधव, रामकिशन जाधव, नितिन निलवर्ण, अंगद मगर, लक्ष्मण मगर, राजेभाऊ मगर आदींचा सहभागी झाले होते. जो पर्यंत रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला.
 

Web Title: Farmer Sukanu Committee's agitation demanded the amount of tired money at Manavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.