पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 07:12 PM2018-04-10T19:12:18+5:302018-04-10T19:12:18+5:30

पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतात पिकाला पाणी देताना विजेचा धक्काबसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.

A farmer who gives water to the crop dies due to electric shocks | पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

googlenewsNext

परभणी : पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतात पिकाला पाणी देताना विजेचा धक्काबसून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. गणेश भगवान चाळक असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, गणेश चाळक आज सकाळी आपल्या शेतातील भुईमुग पिकाला पाणी देत होते. त्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा खाली लोंबकळत आहेत. पिकाला पाणी देत असताना याच तारांना स्पर्श झाल्याने चाळक यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. 

 

Web Title: A farmer who gives water to the crop dies due to electric shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.