जलयुक्त शिवार अभियानाबाबत शेतकरी असमाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:18 AM2020-12-31T04:18:12+5:302020-12-31T04:18:12+5:30
भूमिअभिलेख कार्यलयाचे संगणीकरण होऊन मोजणीत चुका गंगाखेड - राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण उपक्रमात जमिनी मोजण्यासाठी ई- महाभूमीअंतर्गत संगणीकरण झाले. संगणीकरण ...
भूमिअभिलेख कार्यलयाचे संगणीकरण होऊन मोजणीत चुका
गंगाखेड - राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण उपक्रमात जमिनी मोजण्यासाठी ई- महाभूमीअंतर्गत संगणीकरण झाले. संगणीकरण होऊन शेतजमिनीच्या मोजणीत चुका होत आहेत. सातबाराप्रमाणे दाखविलेले एकरचे प्रमाण बरोबर येत नाही. जमीन मोजणीनंतर शेत सातबारा उतारा एवढे निघत नसल्याच्या घटना समोर येत आहेत. जमिनीचे भाव वाढत चालले असल्याने शेतकरी जमिनी मोजून आपल्या हद्दी कायम करण्यावर भर देत आहेत.
रोजगार हमी योजना कागदावर
गंगाखेड- तालुक्यातील मजूर पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध शहरांत बांधकाम मजूर म्हणून मोठ्या संख्येने गेले होते. मात्र तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ते परत आपल्या गावी आले. सध्या या मजुरांना रोजगार हमी योजनेत काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगार हमीची कामे कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.